IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) गुजरातचा (Gujarat Giants) पराभव करत पाचव्यांदा आयपीएल चषक (IPL Trophy) जिंकल्यानंतर मैदानातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, अखेरच्या दोन चेंडूवर संघाला सामना जिंकवून देणारा रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या विजयाचा खरा हिरो ठरला. रवींद्र जाडेजाने चौकार लगावल्यानंतर त्याची पत्नी रिवाबालाही ((Rivaba Jadeja) अश्रू अनावर झाले होते. सामना संपल्यानंतर रिवाबा जाडेजा मैदानात आली होती. विशेष म्हणजे मैदानात येताच ती रवींद्र जाडेजाच्या पाया पडली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईसमोर 15 ओव्हर्समध्ये 171 धावांचं आव्हान होतं. यावेळी चेन्नईने 5 गडी राखत गुजरातचा पराभव केला. रवींद्र जाडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला. रवींद्र जाडेजाने 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. पण त्याने खेळलेल्या या 6 चेंडूमधील शेवटचे 2 चेंडू महत्त्वाचे होते. शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 धावांची आवश्यकता होती. पण मोहित शर्माने जबरदस्त गोलंदाजी केल्याने सामना 2 चेंडूत 10 धावांवर पोहोचला होता. याचवेळी रवींद्र जाडेजाने 1 षटकार आणि 1 चौकार ठोकत गुजरातच्या तोंडातून घास हिरावून घेतला. 


IPL Final: धोनीसोबत झालेल्या वादाची चर्चा अन् टप्प्यात कार्यक्रम; रवींद्र जाडेजा ट्वीट करत म्हणाला "माही तुझ्यासाठी...."


 


रवींद्र जाडेजामुळे चेन्नई सुपरकिंग्सने पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे मैदानात तर गुजरात जिंकेल असं वातारवरण तयार झाल्याने सर्व खेळाडू जल्लोष करण्याच्या तयारीत होते. पण जाडेजाच्या त्या दोन फटक्यांनी सगळं समीकरणच बदलून टाकलं. 


सामना जिंकल्यानंतर रवींद्र जाडेजा धोनीच्या दिशेने धावत सुटला होता. यावेळी धोनीने रवींद्र जाडेजाला उचलून घेत आपला आनंद साजरा केली. जाडेजानेही हा विजय धोनीला समर्पित करत असल्याच सांगितलं. याउलट गेल्या हंगामात चेन्नई चांगली कामगिरी करु शकला नव्हता. गेल्या हंगामात चेन्नई फक्त 14 सामने जिंकलं होतं. पण ती सर्व कसर जाडेजाने या हंगामात भरुन काढली. 


दरम्यान सामना संपल्यानंतर रिवाबा जाडेजा मुलीसह मैदानात आली होती. मैदानात येताच तिने पतीला अलिंगन देण्याआधी पाया पडली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण त्यांचं कौतुक करत आहे. हेच आपल्या सुंदर संस्कृतीचं दर्शन असल्याची कमेंट काहींनी केली आहे. 



सामना संपल्यानंतर रवींद्र जाडेजाने धोनीला समर्पित करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रवींद्र जाडेजाने धोनीसोबत हातात ट्रॉफी घेतलेला फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "एकमेव धोनीसाठी आम्ही करुन दाखवलं. माही भाई तुझ्यासाठी कायपण".



दरम्यान चेन्नईच्या विजयानंतर रवींद्र जाडेजाने 41 वर्षीय धोनीचं कौतुक केलं. "चेन्नईच्या चाहत्यांचे खूप अभिनंदन. हा विजय आमच्या संघातील एका खास सदस्याला  एमएस धोनीला समर्पित करू इच्छितो," असं जाडेजाने सामन्यानंतर सांगितले