IPL 2022 : आयपीएल 2022 चा मेगा लिलाव पूर्ण झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती या सामने सुरु होण्याची. आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होणार आहेत. याबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हंगामासाठी चाहते खूप उत्सुक आहेत कारण यावेळी विजेतेपदाची लढत 8 ऐवजी एकूण 10 संघांमध्ये असणार आहे. (IPL 2022 format )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI ने IPL 2022 संदर्भात नवीन माहिती शेअर केली आहे. जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट या रिपोर्टद्वारे...


IPL 2022 स्पर्धेबद्दल मोठे अपडेट (IPL 2022 Update)


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी जाहीर केले की, यावेळी सर्व 10 संघ हे आयपीएल 2022 मध्ये एकूण 14 लीग सामने खेळतील. ज्यामध्ये प्रत्येक संघ 5 संघांविरुद्ध दोन सामने आणि 4 संघांविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. त्याचबरोबर या मोसमात एकूण साखळी सामन्यांसाठी 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. 


- मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना अ गटात ठेवण्यात आले आहे.


- चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.


याआधी 8 संघांच्या स्पर्धा दुहेरी राऊंड गटाशिवाय खेळल्या जात होत्या. ज्यामध्ये प्रत्येक संघ उर्वरित संघांविरुद्ध 2-2 सामने खेळत होता. पण, या मोसमात दोन नवीन संघ आल्याने फॉरमॅटमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. दोन्ही गट सीडिंग पद्धतीच्या आधारे बनवले गेले आहेत ज्यामध्ये ते किती वेळा चॅम्पियन झाले आणि किती वेळा फायनल खेळले याच्या आधारावर संघ विभागले गेले आहेत.


उदाहरणार्थ, कोलकाता नाईट रायडर्स त्यांच्या गटातील मुंबई, राजस्थान, दिल्ली आणि लखनौविरुद्ध 2-2 सामने खेळतील. त्याचवेळी दुसऱ्या गटातील समान फळी असलेला संघ हैदराबादविरुद्धही 2 सामने खेळणार आहे. त्याचवेळी चेन्नई, बंगळुरू, पंजाब आणि गुजरात विरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. या मोसमात एकूण 70 लीग सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये 55 सामने मुंबईत तर 15 सामने पुण्यात होणार आहेत.


आयपीएल 2022 चे 20 सामने वानखेडे स्टेडियमवर, 15 सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि 20 सामने DY पाटील स्टेडियमवर तर 15 सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. प्रत्येक संघ वानखेडे स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर 4-4 सामने खेळणार आहे. याशिवाय ब्रेबॉर्न स्टेडियम (CCI) आणि पुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर 3-3 सामने खेळवले जातील.