IPL Mega Auction 2022 | Ishan Kishan मालामाल, आतापर्यंतचा दुसरा महागडा भारतीय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे.
बंगळुरु : आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठीचा मेगा लिलाव (Ipl Mega Auction 2022) सुरु आहे. या लिलावात आतापर्यंत अनेक खेळाडू हे मालामाल झाले आहेत. दरम्यान या लिलावात आतापर्यंत विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन (Ishan Kishan) महागडा खेळाडू ठरला आहे. ईशानवर सर्वाधिक बोली लावण्यात आली. तसेच ईशान या मोसमातील लिलावतील महागडा खेळाडू ठरला आहे. (ipl mega auction 2022 day 1 mumbai indians ishan kishan become 2nd expensive indian player after yuvraj singh)
ईशानला त्याच्या बेस प्राईजपेक्षा कितीतरी पट अधिक रक्कम मिळाली आहे. ईशान मालामाल झाला आहे. मुंबई इंडियन्सने ईशानसाठी तब्बल 15 कोटी 25 लाख मोजले आहेत. ईशानची बेस प्राईज ही 2 कोटी होती.
ईशानला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी गुजरात, पंजाब आणि मुंबईमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र अखेरीस मुंबईनेच जास्त किंमत मोजून ईशानला आपल्या ताफ्यात घेतलंच.
दुसरा भारतीय महागडा खेळाडू
दरम्यान ईशान हा आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासातील दुसरा महागडा भारतीय खेळाडू (most expensive indian player in ipl history) ठरला. याआधी दिल्लीने युवराज सिंहसाठी 2015 मध्ये दिल्लीने 16 कोटी मोजले होते.
सर्वाधिक सिक्स
आयपीएल म्हणजे फटकेबाजीचा गेम. टी 20 क्रिकेटमध्ये फोर-सिक्सशिवाय काम होत नाही. ख्रिस गेल, कायरन पोलार्ड यासारखे खेळाडू हे खणखणीत सिक्स मारण्यसााठी ओळखले जातात.
मात्र ईशानने आयपीएलच्या 13 व्या मोसमात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला होता. ईशानने या 13 व्या मोसमात सर्वाधिक 30 सिक्स खेचले होते.