IPL PBKS Team 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावाला सुरुवात झाली आहे. लिलावात आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंवर चांगली बोली लागली आहे. या सीजनमध्ये अनेक खेळाडू मालामाल होणार आहे. त्याआधी पंजाब संघाने आपले 8 खेळाडू निश्चित केले आहे. पंजाबने फक्त दोन खेळाडू म्हणजेच मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांना राखून ठेवले होते. त्यामुळे त्यांच्याकडे लिलावात खर्च करण्यासाठी 72 कोटी होते. 2022 च्या IPL मेगा-लिलावात त्यांच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे उपलब्ध आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

PBKS मोठ्या प्रमाणावर फेरबदल करणार आहेत आणि जवळजवळ सर्व स्थानांसाठी त्यांना खेळाडू निश्चित करावे लागणार आहे. मग तो मयंकसाठी सक्षम सलामीचा जोडीदार असो, मधल्या फळीचा भक्कम गोलंदाज असो किंवा स्फोटक गोलंदाज असो. मयंककडे कर्णधारपदाचा एक सक्षम पर्याय असला तरी ते लिलावात नवीन कर्णधाराच्या शोधात असतील.


सर्वात मोठा फायदा करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज रबाडा होता ज्याने पंजाब किंग्जने त्याला 9.25 कोटी रुपयांना विकत घेतले. भारताच्या वरिष्ठ खेळाडूंवर काही मोठ्या बोली लागल्या होत्या आणि शिखर धवनला पंजाब किंग्जकडून 8.25 कोटी रुपये मिळाले.


आयपीएल लिलावात पंजाब किंग्जने निवडलेले खेळाडू:


शिखर धवन (8.25 कोटी), रबाडा (9.25 कोटी)


शिखर धवन, मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा