IPL Mega Auxction 2021 | या 5 खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रँचायंजीमध्ये असेल चुरस
संघात होणार जोरदार टक्कर
मुंबई : आयपीएल मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. देशातील आणि जगातील सर्व क्रिकेटपटू येथे आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवतात. IPL 2021 मध्ये खूप धावा झाल्या. तसेच फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा भरपूर पाऊस पाडला. IPL 2022 साठी मेगा लिलाव काही दिवसांनी होणार आहे. अशा परिस्थितीत आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंवर सर्व फ्रँचायझींचे लक्ष असेल. जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल.
ऋतुराज गायकवाड
CSK कडून खेळलेल्या ऋतुराज गायकवाडने IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने 16 सामन्यात 45.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 धावा केल्या आणि तो ऑरेंज कॅपचाही पात्र ठरला. यादरम्यान त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले आयपीएल शतकही झळकावले.
फाफ डुप्लेसिस
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज फाफ डू प्लेसिसने CSK साठी सलामी दिली. आयपीएल २०२१ मध्ये त्याची बॅट जोरात चालत होती. CSK कडून खेळताना फाफ डु प्लेसिसने 16 सामन्यात 633 धावा केल्या. केकेआरविरुद्धच्या अंतिम सामन्यातही डुप्लेसिस सामनावीर ठरला. जर सीएसकेने या धडाकेबाज फलंदाजाला कायम ठेवलं नाही, तर मेगा लिलावात सर्व संघांच्या नजरा त्याच्यावर असतील.
के एल राहुल
भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. या शानदार फलंदाजाने आयपीएल 2021 च्या 13 सामन्यांमध्ये 626 धावा केल्या. मेगा लिलावात राहुलसाठी मोठी बोली लागू शकते.
शिखर धवन
शिखर धवन हा टीम इंडियाच्या खतरनाक फलंदाजांपैकी एक आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. आयपीएल 2021 मध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 587 धावा केल्या आहेत. मेगा लिलावात सर्व संघांच्या नजरा नक्कीच शिखर धवनवर असतील, कारण धवन फलंदाजीसोबतच सलामीची जबाबदारीही पार पाडू शकतो.
ग्लेन मॅक्सवेल
ग्लेन मॅक्सवेल हा जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. त्याने आयपीएल 2021 मध्ये बंगळुरूसाठी 15 सामन्यात 513 धावा केल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. सर्व फ्रँचायझी त्याला त्यांच्या संघात समाविष्ट करू इच्छितात.