MI Full Squad, IPL 2025: इंडियन प्रिमिअर लीगचं मागील पर्व मुंबई इंडियन्सच्या संघासाठी फारच वाईट गेलं. नेतृत्व हार्दिक पांड्याकडे गेल्यानंतर मुंबईचा संघ 2024 च्या आयपीएलमध्ये तळाशी राहिला. पाच वेळा आयपीएलचा चषक जिंकणाऱ्या या संघासमोर 2025 साली चांगली कामगिरी करण्याचं नक्कीच प्रेशर असणार यात शंका नाही. त्यामुळेच आहे त्या संघातून अनेक खेळाडू रिटेन्शनदरम्यानच वगळणाऱ्या मुंबईच्या संघाने मेग ऑक्शनमध्ये दमदार खरेदी केली असली तरी अधिक पैसा उधळण्याऐवजी मुंबईने यंदा स्मार्ट पर्चेसिंगला म्हणजेच अक्कल हुशारीने खरेदी करण्यास प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं आहे. 


मुंबई इंडियन्सच्या संघाने 18 खेळाडूंची केली खरेदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सच्या संघाने 18 खेळाडूंना यंदाच्या पर्वामध्ये नव्याने करारबद्ध करण्याचा निर्णय घेत मेगा ऑक्शनमध्ये त्यांचा संघात समावेश करुन घेतला आहे. सौदी अरेबियामध्ये रविवारी आणि सोमवारी म्हणजेच 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलावामध्ये मुंबईने केलेली सर्वात महागडी खरेदी ही ट्रेंट बोल्ट ठरला. मुंबई इंडियन्सच्या संघाच्या ऑक्शन टेबलवर आकाश अंबानींबरोबरच निता अंबानीही विचारपूर्वक सल्लामसलत करुन खेळाडूंची निवड करत असल्याचं पाहायला मिळालं. मुंबईने यांच्या लिलावात कोणाकोणाला संघात स्थान दिलं आहे पाहूयात...


मुंबईने विकत घेतलेले 18 खेळाडू आणि त्यांच्यासाठी मोजलेली रक्कम:


1. रॉबीन मिन्झ - Rs 65 lakh


2. करण शर्मा - Rs 50 lakh


3. रायन रिकेल्टन - Rs 1 crore


4. अल्लाह गाझनफर - Rs 4.8 crore


5. अश्वीन कुमार - Rs 30 lakh


6. मिचेल सॅण्टनर - Rs 2 crore


7. रेस टॉप्ले - Rs 75 lakh


8. श्रीजित कृष्णन् - Rs 30 lakh


9. राज अंगद बावा - Rs 30 lakh


10. सत्य नारायण राजू - Rs 30 lakh


11. बिवेन जॅकब्स - Rs 30 lakh


12. अर्जून तेंडुलकर - Rs 30 lakh


13. लिजाड विल्यम्स - Rs 75 lakh


14. विग्नेश पुथ्थूर - Rs 30 lakh


15. नमन धीर - Rs 5.25 Crore


16. विल जॅक्स - Rs 5.25 crore


17. दीपक चहर - Rs 9.25 crore


18. ट्रेंट बोल्ट - Rs 12.5 Crore



मुंबईच्या संघाने लिलावापूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी


रोहित शर्मा


सुर्यकुमार यादव


तिलक वर्मा



हार्दिक पांड्या


जसप्रीत बुमराह