मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स चेपॉक स्टेडियमवर सामना झाला. अटीतटीच्या सामन्यात 10 धावांनी मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता संघावर विजय मिळवला. यावेळी सर्वात महत्त्वाची आणि चर्चेची गोष्ट होती ती म्हणजे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मात तब्बल IPLमध्ये 7 वर्षांनी पुन्हा बॉलिंग करताना दिसला. मात्र यावेळी त्याला दुखापतही झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यापूर्वी रोहित शर्माचा बॉलिंगचा सराव करतानाचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरून अनेक जणांना हिटमॅन बॉलिंगसाठी मैदानात उतरणार का याची प्रतीक्षा होती. नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा 7 वर्षांनंतर पुन्हा बॉलिंग करण्यासाठी उतरला. मात्र पहिला बॉल टाकण्याआधीच तो जखमी झाला. 






हिटमॅन रोहित शर्मा पहिला बॉल फेकण्यासाठी आला तेव्हा त्याचा पाय मुरगळला. संघातील खेळाडूंनी त्याला आधार देत बॉन्ड्रीजवळ घेऊन गेले तिथे रोहित शर्मा पायाचा व्यायाम करताना दिसला.


2014 रोजी रोहित शर्मानं IPLमध्ये बॉलिंग केलं होतं. त्यानंतर काल झालेल्या सामन्यात तो बॉलिंग करताना दिसला. रोहित शर्माचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 


मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना 17 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर 20 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार आहे.