IPL 2022 : नव्या टीम धोक्याच्या, काय आहे नेमकी गडबड?
यामुळे क्रिकेटचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे
दुबई : पुढील वर्षापासून आयपीएल आणखी रोमांचक होणार आहे कारण आता भारताच्या मेगा टी20 लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ भाग घेतील. त्याचवेळी, यामुळे क्रिकेटचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असं मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल अथर्टन यांनी व्यक्त केलं आहे.
आयपीएलच्या 2 नव्या टीम्स
आरपी-एसजी ग्रुपने लखनऊ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाची मालकी 5166 कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
'क्रिकेटर पैशाच्या मागे धावतील'
मायकेल आथर्टन यांनी 'द टाइम्स'च्या कॉलममध्ये लिहिलंय की, "क्रिकेटर्स पैशाच्या मागे धावतील, जर मार्केट नियंत्रणाबाहेर गेला तर कमीत कमी फायद्याचा खेळाचं नुकसान होईल. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, अनेक देशांमध्ये कसोटी क्रिकेटचे टीव्ही मार्केट फार कमी आहे. खेळाडू आणि त्यांचे प्रमुख नियोक्ते यांच्यातील संबंधांमध्ये मतभेद होतील."
मायकेल आथर्टन पुढे म्हणाले, "या वर्ल्डकपमध्ये दुखापतीमुळे इंग्लंडने सेंट्रेल कॉन्ट्रॅक्टमधील दोन खेळाडू गमावले आहेत. रेवेन्यू समतोल आणि आयपीएलकडे ओढा यामुळे खेळात तणाव निर्माण होईल. आयपीएलची ही प्रगती थांबवणे सोपं जाणार नाही. जर खेळाचा उद्देश केवळ गुंतवणूकदारांना रिटर्न मिळवून देणं हा असेल, तर खेळाचा मौल्यवान पैलू नष्ट होईल."
आयपीएलचा कसोटी क्रिकेटवर परिणाम होईल का?
आयपीएल सीझनमध्ये बराच वेळ घालवल्यामुळे, बायो बबलचा थकवा येतो. ज्यामुळे क्रिकेटर्स विश्रांतीच्या शोधात असलेल्या कसोटी मालिकाही गमावतात. नवीन संघांच्या आगमनामुळे स्पर्धेचा कालावधी वाढेल आणि बीसीसीआय बिग विंडोच्या शोधात असेल. ज्याचा उर्वरित मालिकेवर परिणाम होईल.