Mumbai Indians Playoffs Scenario : आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला. आशुतोष शर्माच्या वादळी खेळीनंतर देखील पंजाब किंग्जने सामना गमावला. मुंबईने तीन सामने जिंकत 6 गुण नावावर केले आहेत. त्यामुळे आता मुंबईने 7 व्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबई इंडियन्सने सात विकेट गमवात 192 धावा केल्यात होत्या. त्यामुळे मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 193 धावांचं लक्ष होतं. मुंबईतर्फे सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 78 धावा केल्या. तर रोहित शर्माने 36 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना पंजाबचा संघ ढेपाळला होता. मात्र, आशुतोष शर्मा आणि शशांक सिंग यांनी आक्रमक खेळी केली अन् मुंबईच्या दिशेने झुकलेला सामना पुन्हा बाजूने पलटवला. आशुतोष शर्माने 28 बॉलमध्ये 61 धावा केल्या. त्यात त्याने 7 फोर अन् 2 सिक्स लगावले. तर शशांकने 25 बॉलमध्ये 41 धावा कुटल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाईंट्स टेबलची स्थिती


राजस्थान रॉयल्स अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आरआरकडे 12 गुण झाले असून आता प्लेऑफचं गणित अगदी सोपं झालंय. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज देखील 8 अंक अन् 0.726 नेट रननेटसह टॉप 4 मध्ये आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयानंतर देखील +0.502 नेट रनरेटसह 8 अंक खात्यात जमा केले आहेत.


पाईंट्स टेबलमध्ये, लखनऊ सुपर जाएन्ट्सचा संघ 6 अंकासह 5 व्या स्थानी आहे. तर सहाव्या क्रमांकावर दिल्लीने झेप घेतली आहे. दिल्लीचा नेट रनरेट -0.074 आहे. पंजाबचा पराभव केल्यानंतर मुंबई इंडियन्सने मोठी झेप घेतली आहे. मुंबई 9 व्या स्थानावरून आता 7 व्या स्थानी उडी मारलीये. मुंबईकडे 6 अंक आणि -0.133 चा नेट रननेट आहे. तर गुजरातचा संघ 8 व्या स्थानी आहे. तसेच पराभवानंतर देखील पंजाबचा संघ 9 व्या स्थानी कायम आहे. पंजाबच्या खात्यात -0.255 नेट रननेट आहे. तर पाईंट्स टेबलच्या बॉटमवर आरसीबीचा संघ केवळ 2 अंकासह आहे.


मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचं गणित


मुंबई इंडियन्सने सात सामने खेळले असून अजून सात सामने बाकी आहेत. कोलकातासोबत दोन सामने तर लखनऊविरुद्ध दोन सामने मुंबईचे असणार आहे. तर मुंबईला टेबल टॉपर राजस्थानविरुद्ध एक, तर दिल्ली आणि हैदराबादविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळायचा आहे. त्यामुळे आता मुंबईला जर विजय हवा असेल तर आगामी 7 सामन्यात कमीतकमी 5 सामने जिंकावे लागणार आहे. उर्वरित 7 सामन्यांपैकी 4 सामने मुंबईसाठी अवघड असतील. त्यामुळे आता पांड्याच्या नेतृत्वात मुंबई प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग ईलेव्हन) : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.


गुजरात टायटन्स (प्लेईंग ईलेव्हन) : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.