LSG historical against GT : युवा गोलंदाज यश ठाकूरच्या पाच विकेट्स आणि कृणाल पांड्याच्या तीन विकेट्सच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर आता लखनऊने सलग तिसरा विजय नोंदवला आहे. आयपीएलमध्ये लखनऊचा गुजरातवरचा हा पहिला विजय आहे. या विजयासह लखनऊचा संघ 6 गुणांसह अंकतालिकेत (IPL Points Table Scenario) तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर गुजरात टायटन्स संघ 5 सामन्यांत 2 विजय आणि 3 पराभवांसह 4 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता संघ कितव्या स्थानी?


राजस्थान रॉयल्सचा संघ चार सामन्यातील चार विजयासह अव्वल स्थानी आहे. त्यांच्या खात्यात 8 गुण जमा झाले आहेत. तर दुसऱ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सच्या खात्यात तीन सामन्यातील तीन विजयासह 6 गुण आहेत. त्यानंतर  लखनऊचा नंबर लागतो. चौथ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने 4 सामन्यातील 2 विजयासह 4 गुण घेतलेत. तसेच पाचव्या स्थानी यंदाची सर्वात धाकड अशी हैदराबादची टीम आहे, त्यांकडे 4 सामन्यातील 2 विजयामुळे 4 गुण आहेत.


पाईंट्स टेबलच्या खालच्या फळीवर लक्ष दिलं तर,  पंजाब किंग्ज 4 सामन्यात 4 गुणांसह -0.220 नेट रनरेटवर आहे. तसेच गुजरात जाएन्ट्स अंकतालिकेत 7 व्या स्थानी आहे. पहिल्या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स तळ सोडला असून मुंबईची टीम 8 व्या स्थानी आलीये. तर आरसीबीला सुर आवळल्याने आता आरसीबी 5 सामन्यातील 2 अंकासह 9 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर दिल्लीची देखील तीच अवस्था पहायला मिळतेय. दिल्लीला 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवता आलाय. त्यात दिल्ली -1.370 नेट रनरेटसह 10 व्या स्थानावर आहे.



लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन) : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (C), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव.


गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : शुभमन गिल (C), बेलूर रवि सरथ, साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.