Rishabh Pant : पंत आले... डोळ्यावर गॉगल, हातात काठी, दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी ऋषभ स्टेडिअममध्ये, Video
दिल्ली कॅपिटल्स संघाला पाठिंबा देण्यासाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये हजर, ऋषभ पंतला पाहाताच स्टेडिअममध्ये ऋषभ पंतच्या चाहत्यांनी जल्लोष केला. पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabha Pant in Stadium : आयपीएलच्या सोळाव्या (IPL 2023) हंगामातील सातवा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जात आहे. दिल्ली कॅपिटन्स (Delhi Capitals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आमने सामने आहेत. गुजरातने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने पहिली फलंदाजी करताना 8 विकेट गमावत 162 धावा केल्या. या सामन्यात दिल्लीला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या चाहत्यांना एक सुखद धक्का बसला. दिल्लीची फलंदाजी सुरु असताना स्टेडिअममध्ये अचानक ऋषभ पंतची एन्ट्री झाली. ऋषभ पंतला (Rishabh Pant) पाहाताच चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष सुरु केला. पंतनेही हात हलवत चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या. (Rishabh Pant Reached Delhi Stadium)
ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. पण गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम तो खेळू शकला नाही. पंतच्या जागी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आपल्या संघाला चिअर करण्यासाठी ऋषभ पंत स्टेडिअममध्ये पोहोचला. सफेद टी-शर्ट, डोळयांवर काळा गॉगल आणि हातात काठी असलेल्या ऋषभ पंतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या कारने ऋषभने स्टेडिअम गाठलं. ऋषभला पाहाताच चाहत्यांनी त्याला गराडा घातला.
पंतच्या कारला अपघात
30 डिसेंबर 2022 ला दिल्लीहू रुढकीकडे जात असताना ऋषभच्या कारला भीषण अपघात झाला. वेगाने येणाऱ्या कारने डिव्हायडरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की पंतच्या कारला आग लागली. सुदैवाने पंत यातून बचावला. स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याला मुंबईतल्या कोकीळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. पंतचाय पायाल फ्रॅक्चर आहे. त्यामुळे आणखी काही काळ त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे.
पंतच्या जागी अभिषेक पोरेलला संधी
दरम्यान, दिल्लीच्या संघात आज अनेपेक्षित बदल पाहिला मिळाला. कर्णधार डेव्हिड वॉर्नरे 19 वर्षांच्या युवा फलंदाजाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली. ऋषभ पंतच्या जागी भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघातील अभिषेक पोरेलला दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवण्यात आलं. अभिषेक हा फलंदाज आणि विकेटकिपर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून तो खेळतो. अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता.