फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोचा क्बल खरेदी करणार आयपीएल टीम?
इंग्लंडचा सुप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला असल्याच्या चर्चा आहेत.
मुंबई : आयपीएलची क्रेज ही काही केवळ भारतात नाही. भारताबाहेरील लोकांनाही आयपीएलचे सामने पाहाणं सोडवत नाही. येणाऱ्या सीझनमध्ये आयपीलच्या टीम्सची संख्या वाढून 10 होणार आहे. दोन अतिरीक्त टीम वाढणार असून या टीम खरेदी करण्यासाठी अनेक मोठे व्यक्ती तयार असल्याची चर्चा आहे. अशातच आता मँचेस्टर युनायटेडचं नाव देखील पुढे येतंय.
इंग्लंडचा सुप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 21 सप्टेंबर रोजी आयपीएल संघांसाठी निविदा प्रक्रियेची तारीख वाढवत असल्याचं कारण दिलंय. आयपीएल 2022 मध्ये दोन नवीन संघ जोडले जातील, ज्यामुळे संघांची एकूण संख्या 10 होईल.
मँचेस्टर युनायटेड संघ खरेदी करण्यास उत्सुक?
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितलं की, "मँचेस्टर युनायटेडच्या मालकांनी आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, "मँचेस्टर युनायटेड आयपीएल संघ खरेदी करण्यास उत्सुक आहे. बीसीसीआयने निविदा खरेदी करण्याची तारीख वाढवण्याचं हे देखील एक कारण असू शकते."