IPL 2021 MI vs DC: दिल्लीचा दबदबा कायम! 6 विकेट्सनं मुंबईवर विजय
चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना नुकताच पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आपला दबदबा कायम राखला आहे.
मुंबई: चेपॉक स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना नुकताच पार पडला. या सामन्यात दिल्ली संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. 6 विकेट्सने दिल्ली कॅपिटल्स संघाने विजय मिळवला आहे. तर IPLच्या पॉईंट टेबलमध्ये आपलं दुसरं स्थान संघाने कायम ठेवलं आहे.
टॉस जिंकून मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटिंग निवडली. रोहितने 30 बॉलमध्ये 44 रन तर इशान किशननं 28 बॉलमध्ये 26 रन केले. सुर्यकुमार यादवने 15 बॉलमध्ये 24 रन केले. 137 रन करून 9 गडी गमवाल्यानंतर दिल्लीसमोर मुंबईनं 138 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
दिल्ली संघातील शिखर धवन, स्टिव स्मित आणि ललित यादवने उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. सलग दुसऱ्या सामन्यात गब्बरचा जलवा पाहिला मिळाला. या सामन्यात अर्धशतक हुकलं मात्र 42 बॉलमध्ये 45 रन केले. स्टीव स्मिथने 29 बॉलमध्ये 33 रन केले तर ललित यादवने 25 बॉलमध्ये 22 रन केले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळून 7 विकेट्सने विजय मिळवला. राजस्थान विरुद्धच्या सामन्यात मात्र मोठा पराभव पदरात पडला. मात्र त्यानंतर झालेल्या पंजाब आणि मुंबई विरुद्ध सामन्यात पुन्हा दिल्ली संघाने दणदणीत विजय मिळवला आहे.
25 एप्रिल रोजी आता हैदराबाद विरुद्ध सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. यावेळीतरी हैदराबादला दिल्लीवर विजय मिळवता येणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दिल्ली पुन्हा एकदा आपला दबदबा कायम राखणार का हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.