मुंबई: मुंबई इंडियन्स आणि हैदराबात संघाला पराभूत करून IPLच्या सुरुवातीच्या टप्प्यात RCB संघानं टेबल पॉइंटमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. सध्या RCB आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून रस्सीखेच सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद विरुद्ध 6 धावांनी सामना जिंकल्यानंतर RCB संघ पॉइंट टेबलवर पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर ट्वीटरवर नेटकऱ्याकडून विराट कोहली आणि RCB संघाबद्दल मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स वाजून तुम्हालाही हसू आवरणार नाहीय.









शाहबाजने सतराव्या ओव्हरमध्ये सामना पलटला. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे हैदराबादचं मनोबल खचलं आणि सामन्यावरची पकड सुटली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा 6 धावांनी विजय झाला. या विजयात ग्लॅन मॅक्सवेलनं देखील अर्धशतकी खेळी केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघ थोडक्यासाठी पराभूत झाल्यानं काव्या मारनसह चाहत्यांचे डोळेही पाणावले. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.


आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 149 रन केले होते. ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 41 बॉलमध्ये 59 रन केले. या दरम्यान त्याने 5 फोर आणि 3 सिक्स देखील ठोकले. विराट कोहलीने 33, शहबाज अहमदने 14 आणि काइल जेमीसनने 12 रन केले.


हैदराबादने टॉस जिंकल्यानंतर आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरच्या संघाला आरसीबीवर विजय मिळवण्यात अपयश आलं. विराट कोहलीच्या संघाने हा सामना 6 रनने जिंकला आहे.