डबलिन :  टीम इंडियाचा युवा स्टार बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात खणखणीत शतक ठोकलं. हुड्डा यासह टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सुरेश रैना, रोहित शर्मा आणि केएल राहुलनंतर शतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरला. हुड्डाने या शतकासह आपली उपयुकत्ता सिद्ध करुन दाखवली. तसेच आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी आपली दावेदारीही सिद्ध केली. दीपक येत्या काळात टीम इंडियाच्या 3 स्टार खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरु शकतो. तसेच त्यांची जागाही हिसकावू शकतो. (ire vs ind t20 series deepak hudda make century and crete trouble for suryakumar shreyas and venketesh iyer)


श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या प्रमुखे खेळाडूंपैकी एक आहे. श्रेयस सध्या सिनिअर टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. श्रेयसला मागील काही महिन्यांमध्ये विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र आता हुड्डाच्या शतकानंतर श्रेयससाठी धोक्याचा इशारा आहे.


हुड्डा येत्या काळात असाच खेळत राहिला, तर श्रेयसला आपलं स्थान गमवावू लागू शकतं. दीपकमध्ये ओपनिंगपासून ते शेवटपर्यंत कोणत्याही स्थानी खेळण्याचं कौशल्य आहे, जे की क्वचित खेळाडूंमध्येच असते.


सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)


सूर्यकुमार यादव टीम इंडियाची पहिली पसंत राहिली आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला अनेक मालिका खेळायच्या आहेत. अशा परिस्थितीत दीपकजवळ सूर्याला मागे टाकण्याची संधी असणार आहे.    


सूर्याला आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये बॅटिंगची संधी मिळाली. मात्र त्याला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तर दुसऱ्या बाजूला दीपकने 2 सामन्यात 151 धावा केल्या. 


वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer)


वेंकटेश अय्यरला सध्या संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यात हुड्डाने कारनामा करुन दाखवलाय. त्यामुळे आता वेंकटेशला संघात स्थान मिळवण्यसााठी आता आणखी संघर्ष करावा लागणार आहे.