डबलिन : टीम इंडियाने आयर्लंडवर (ire vs ind t20i series) दुसऱ्या टी-20 सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली. कॅप्टन हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने ही कामगिरी केली. पण याच दरम्यान दुसऱ्या टी-20चा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (ire vs ind t20i series team india captain hardik pandya ishan kishan and harshal patel)


नक्की काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाची फिल्डिंग सुरू असताना कॅप्टन हार्दिक पंड्या चिडला आणि त्याने इशान किशन आणि हर्षल पटेल यांना शिवीगाळ केली. दोघांच्या सांगण्यावरून हार्दिकने 2 रिव्हीव्यू घेतले. हे दोन्ही रिव्हीव्यू वाया गेले. यामुळे हार्दिक संतापला, असा दावा केला जातोय. 


हर्षल पटेल आयर्लंडच्या डावातील 11 वी ओव्हर टाकत होता. हार्दिकने टाकलेला बॉल आयर्लंडच्या बॅट्समनच्या पॅडवर आदळला आणि थेट इशान किशनच्या दिशेने गेला. त्यानंतर हार्दिकने हर्षल-इशानच्या सल्ल्यानुसार रिव्हीव्यू घेतला, पण तो निर्णय चुकीचा ठरला.


या सर्व प्रकाराचा व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत काही अपशब्द वापरल्याचा दावा केला जात आहे. या व्हीडिओमध्ये हार्दिकनेच शिवी दिल्याचं काही नेटीझन्सचं म्हणनं आहे. मात्र झी 24 तास याची पुष्टी करत नाही.


दरम्यान हार्दिक वादात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही आयपीएलदरम्यान हार्दिकचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हीडिओत हार्दिकने मोहम्मद शमीला शिवीगाळ केली होती. त्यानंतर हार्दिकला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता.