Irfan pathan Flying Kiss : वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियन लीगमध्ये इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी पाकिस्तान चॅम्पियनसचा (IND C vs PAK C) पराभव करून वर्ल्ड चॅम्पियन लीगच्या (World Championship of Legends) ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. इंडिया चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सवर 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा ऑलराऊंडर इरफान पठाणने (Irfan pathan) विनिंग शॉट खेळला अन् पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून ट्रॉफी जिंकली. कॅप्टन युवराज सिंगने ट्रॉफी उचचली आणि पाकिस्तानला आणखी एक जखम दिली आहे. अशातच आता इरफान पठाण याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफान पठाणने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत विस्फोटक खेळी केली. पठाण बंधूंनी आणि युवराजने या सामन्यात अर्धशतक ठोकलं. इरफान पठाणची खेळी सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. इरफान अर्धशतक ठोकून परत जात असताना इरफानची पत्नी (Irfan pathan wife) सफा बेगही स्टँडवर दिसली. त्यावेळी त्याने पत्नीकडे (sada baig) पाहून फ्लाईग किस (Irfan pathan Flying Kiss) दिली. त्यानंतर तो ड्रेसिंग रुमच्या दिशेने जाताना दिसला. ड्रेसिंग रुममध्ये सुरैश रैना, अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांनी त्याचं स्वागत केलं.


इरफान पठाणने स्वत: याचा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केलाय. प्यार, दोस्ती और क्या चाहिये जिंदगी में? असं इरफाणने म्हटलं आहे. 


पाहा Video



इरफानने मानले युवराजचे आभार


युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना आनंद झाला. युवीला हे जिंकायचं होतं. एक कॅप्टन म्हणून तो या ट्रॉफीला पात्र आहे कारण त्याने अल्पावधीतच संघ एकत्र केला आणि प्रत्येकाला त्यांची भूमिका अचूकपणे दिली. आम्ही त्याला खूप सल्ले देऊन खूप त्रास दिला पण त्याने सर्व काही इतक्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलं. त्या फोन कॉलसाठी लव्ह यू भाऊ, असं म्हणत इरफानने युवराज सिंगचे आभार मानले आहेत.


दरम्यान, लग्नानंतर आठ वर्षानंतर इरफानने लग्नाचा वाढदिवशी पत्नीला शुभेच्छा देताना आपल्या पत्नीचा म्हणजेच सफा बेगचा चेहरा दाखवल्याने सोशल मीडियावर इरफान ट्रोल झाला होता. 20 डिसेंबर 2016 रोजी इरफान आणि सफा यांच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला. तर डिसेंबर 2021 मध्ये त्यांना दुसरं मुल झालं होतं.