Irfan Pathan on Sourav Ganguly:  सध्या आयपीएलचा 64 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) महत्त्वाचा आहे. एकीकडे दिल्ली प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेली असताना दुसरीकडे पंजाब किंग्ज हा सामना अधिक चांगल्या रनरेटने जिंकून प्लेऑफ गाठण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने फॅन्सची मात्र निराशा केली. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक इरफान पठाण (Irfan Pathan) याने मोठं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Irfan Pathan ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली डगआऊटमध्ये सौरव गांगुलीची उपस्थिती ही दिल्लीच्या संघासाठी मोठी गोष्ट आहे. गांगुलीला प्रशिक्षकाची जबाबदारीही मिळाली तर ते या संघात मोठा बदल घडवू शकतात, असं मत इरफान पठाणने नोंदवलं आहे. 


सौरव गांगुलीला भारतीय खेळाडूंच्या मानसशास्त्राची समज आहे. ड्रेसिंग रूम कशी हाताळायची हे देखील त्याला माहीत आहे आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याचा फायदा घेतला पाहिजे. टॉसच्या वेळी कॅप्टन वॉर्नरने सांगितलं की, त्याच्या संघाने आता पुढील हंगामासाठी तयारी सुरू केलीये. अशा स्थितीत गांगुलीला नवी भूमिका मिळाली तर वावगं ठरणार नाही, असंही इरफान पठाणने (Irfan Pathan on Sourav Ganguly) बोलताना म्हटलं आहे.


आणखी वाचा - LSG Vs MI: पता है? मुंबई मॅच कुठं हारली? पराभवानंतर तुफान Viral होतोय Video!


दरम्यान, यंदाच्या हंगामात दिल्लीचा नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. विदेशी खेळाडूंचं बॅकअप असून देखील पहिले काही सामने सलग पराभूत झाल्याने दिल्लीला सुर गवसण्यात यश मिळालं नाही. त्यानंतर देखील काही अवघड सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. त्यात सलामीवीर पृथ्वी शॉ देखील फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून आलं.