इरफान पठाणचा खुलासा, माझ्यावर ‘त्या’ गोष्टीमुळे काही खेळाडू भडकले होते!
टीम इंडियात पुन्हा संधी मिळण्याची आशा हरवून बसलेला टीमचा ऑलराऊंडर इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
नवी दिल्ली : टीम इंडियात पुन्हा संधी मिळण्याची आशा हरवून बसलेला टीमचा ऑलराऊंडर इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आलाय. इरफानच्या काही जुन्या गोष्टींना उजाळा देत खुलासा केला की, टीममधील काही खेळाडू त्याच्या फलंदाजीमुळे चिडायचे. इरफानने हा खुलासा एका मुलाखतीत केलाय.
काहींना अडचण
इरफान पठाण याने एका मुलाखतीत खुलासा केलाय की, त्याच्या फलंदाजीने प्रभावित होऊन टीम मॅनेजमेंटने त्याला तिस-या नंबरवर फलंदाजीसाठी प्रमोट करणे सुरू केले होते. पण तेव्हा टीमच्या काही सदस्यांना याबाबत अडचण होती.
एक तर चिडला होता
इरफान पठाणने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, जेव्हा त्याला नंबर ३ वर फलंदाजीसाठी पाठवले जात होते. तेव्हा काहींना ते चांगले वाटत नव्हते. एकदा तर एक खेळाडू चांगलाच भडकला होता. आणि तो म्ह्णाला होता की, याला का, मला पाठवा.
सचिन करायचं कौतुक
सचिन तेंडुलकरचं कौतुक करताना इरफान म्हणाला की, सचिन तेंडुलकर नेहमीच नेटवर त्याचं कौतुक करत होता. तो म्हणत होता की, ‘मी कधीही तुझ्यासारखा स्विंग गोलंदाज पाहिला नाही’.