Hardik Natasa Divorce: हार्दिक-नताशाचा घटस्फोट म्हणजे PR स्ट्रॅटर्जी? पाहा काय आहे प्रकरण
Hardik Natasa Divorce News: IPL 2024 मध्ये यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली होती. असं असताना मुंबई इंडियन्समध्ये परतताना हार्दिक प्रभावी ठरला नाही.
Hardik Natasa Divorce News: गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जातंय. नताशा आणि हार्दिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. हार्दिक आणि नताशा सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवर मौन बाळगून आहेत. दरम्यान आता असा अंदाज लावण्यात येतोय की, अभिनेत्री पूनम पांडेप्रमाणेच हार्दिक नताशाचा घटस्फोट ही देखील पीआर स्ट्रॅटेजी असू शकते. नेमकं हे प्रकरण काय आहे हे पाहूया.
हार्दिकला चीअर करण्यासाठी स्टेडिययमध्ये उपस्थित नव्हती नताशा
IPL 2024 मध्ये यंदाच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पंड्याची निवड करण्यात आली होती. असं असताना मुंबई इंडियन्समध्ये परतताना हार्दिक प्रभावी ठरला नाही. त्यामुळे यावेळी पत्नी नताशाही स्टेडियममध्ये येऊन त्याला चिअर करताना दिसली नाही. यावरूनच या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले नसल्याचा अंदाज लावण्यात आला होता. याशिवाय नताशाने इन्ट्राग्रामवरून पंड्या आडनाव काढून टाकल्याचं समोर आलंय.
हार्दिकने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या
काही दिवसांपूर्वी नताशाचा वाढदिवस झाला. यावेळी हार्दिकने पत्नी नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. हार्दिकने 2023 सालापासून पत्नी नताशासोबतची कोणतीही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केलेली नाही. यावेळी चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, हार्दिकने पत्नीसोबतचे नुकतेच फोटो डिलीट केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक नुकतीच एका व्यक्तीसोबत स्पॉट झाली. हा व्यक्ती दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्स इलिक होता. तो एका रेस्टॉरंटमध्ये दिसला होता. दरम्यान दोघांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी एका पत्रकाराने तिला घटस्फोटाच्या अफवांवर प्रश्न विचारला, यावर ती स्पष्टपणे काहीही बोलली नाही. Thank You so much असं म्हणून ती तिथून पुढे निघून गेली.
हार्दिकच्या संपत्तीचा 70 टक्के भाग मिळणार?
दरम्यान, पोटगीच्या स्वरुपात नताशाला हार्दिकच्या एकूण संपत्तीपैकी 70 टक्के भाग मिळणार असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय. हार्दिक आणि नताशाच्या नात्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, किंवा या दोघांपैकी कोणीही यावर कोणतीही प्रतिक्रियासुद्धा दिलेली नाही