इशान किशननं लगावल्या तब्बल एवढ्या सिक्स, मोडला धोनीचा रेकॉर्ड
झारखंडचा विकेट कीपर इशान किशननं विजय हजारे वनडे क्रिकेट ट्रॉफीच्या मॅचमध्ये सिक्सचा पाऊस पाडला आहे.
मुंबई : झारखंडचा विकेट कीपर इशान किशननं विजय हजारे वनडे क्रिकेट ट्रॉफीच्या मॅचमध्ये सिक्सचा पाऊस पाडला आहे. याचबरोबर किशननं महेंद्रसिंग धोनीचं रेकॉर्डही मोडलं आहे. झारखंड आणि सौराष्ट्रमध्ये झालेल्या या मॅचमध्ये झारखंडला पराभवाचा सामना करावा लागला. इशान किशन झारखंडचा कॅप्टन आणि विकेट कीपर आहे. या मॅचमध्ये सौराष्ट्रनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
झारखंडच्या टीमनं शानदार बॅटिंग करत ३२९ रन्स केले. यामध्ये इशान किशननं ९३ रन्सची खेळी केली. या खेळीमध्ये इशान किशननं ७ सिक्स लगावले. झारखंडकडून खेळताना एका इनिंगमध्ये एवढ्या सिक्स मारण्याचा रेकॉर्ड इशान किशननं केला आहे. याआधी २०१६-१७ मध्ये सौरभ तिवारीनं हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये एका इनिंगमध्ये ७ सिक्स मारले होते. तिवारीच्या आधी धोनीच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. २०१६-१७मध्ये छत्तीसगडविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं ६ सिक्स मारले होते.
झारखंडच्या टीमनं या मॅचमध्ये नऊ विकेट गमावून ३२९ रन्स बनवले. सौराष्ट्रच्या जयदेव उनाडकट, शौर्य सनदिय आणि चिराग जानीनं प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. या रन्सचा पाठलाग करताना जडेजानं ११६ बॉल्समध्ये ७ फोर आणि ४ सिक्सच्या मदतीनं ११३ रन्स केल्या. जडेजाच्या या खेळीमुळे सौराष्ट्रचा विजय झाला. जडेजाबरोबरच चिरागनं ५९ आणि कॅप्टन चेतेश्वर पुजारानं ४४ रन्स केल्या.
मुंबई इंडियन्सकडून खेळणार इशान किशन
आयपीएलच्या लिलावामध्ये इशान किशनला मुंबई इंडियन्सनं ६.२ कोटी रुपयांना विकत घेतलं.