Ishan Kishan Jersey number: लडका कब बडा हो गया, पताही नही चला, अशी चर्चा चहाच्या टपरीवर सुरू झाली ती ईशान किशनच्या (Ishan Kishan) धमाकेदार डबल सेंच्युरीनंतर... ईशानने नुकतंच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात द्विशतक (Ishan Kishan Double Century) झळकावून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध ईशानला संधी मिळाली नाही. त्यांतर ईशानला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही संधी मिळाली होती, पण त्यात तो काही विशेष दाखवू शकला नाही. (Ishan Kishan reveals reason behind wearing jersey number 32 for India sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी रोजी रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात ईशान संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर असल्याने आता ईशान ओपनिंगला उतरण्याची चर्चा सुरू आहे. अशातच सामन्याआधी ईशानचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.


काय म्हणाला Ishan Kishan ?


बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ईशानने अनेक सिक्रेट सांगितले आहेत. जेव्हा मला संघात स्थान मिळालं तेव्हा मला माझ्या जर्सी क्रमांकाबद्दल विचारण्यात आलं. मला 23 नंबरची जर्सी हवी होती पण तो नंबर आधीच कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) देण्यात आला होता. अशा परिस्थितीत मी माझ्या आईचा सल्ला घेतला आणि तिने मला पुन्हा 32 नंबरची जर्सी घेण्यास सांगितलं. मग मी काहीही न विचार करता 32 नंबरची जर्सी घेतली, असं ईशान (Secret behind Ishan Kishan jersey number 32) सांगतो.



क्रिकेटमधील माझा आदर्श महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आहे (Ishan Kishan favorite player). मी झारखंडकडूनही खेळतो आणि तो या संघाकडून खेळला आहे. त्यामुळे मला त्याच्यासारखं व्हायचं आहे. बाकी मला माझ्या खेळाबद्दल मला कशाचीच भीती वाटत नाही. माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी आव्हान म्हणून घेतो, असंही ईशान (Ishan Kishan) यावेळी म्हणालाय.


जर्सीच्या नंबरचा इतिहास काय?


दरम्यान, ऐशीच्या दशकात क्रिकेटमध्ये रंग आले. आयसीसीने 1992 च्या वर्ल्ड कपपासून अधिकृतरित्या वनडे मध्ये जर्सी रंगीत केली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटने पुढाकार घेत एक पाऊल पुढं टाकलं आणि खेळाडूंच्या जर्सीला नंबर दिले. 1999 सालच्या वर्ल्ड कपपासून जगातल्या क्रिकेट टीमच्या जर्सीना नंबर दिले गेले. लकी जर्सी नंबर (Jersey Number) म्हणजे निव्वल अंधश्रद्धेचा खेळ. ज्याला जो नंबर आवडतो. तो खेळाडू तो नंबरची घातलो. फक्त नंबर रिपीट होऊ देयचा नाही, एवढीच अट.