माही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video
Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.
Ishan Kishan Shows Respect For Mahendra Singh Dhoni: महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हे नाव भारतात कोणाला माहिती नाही, असं क्विचित पहायला मिळेल. आयसीसीच्या सर्व प्रकारातील ट्रॉफी पटकावणारा कर्णधार (Captain Cool) म्हणून धोनीला ओळखलं जातं. धोनीच्या मैदानावरील 'कुल'नेसला कोणतीच तोड नाही. आज धोनी संघात नसला तरी अनेक खेळाडू धोनीच्या खेळाची नक्कल करण्याचा प्रयत्न करतात. तसेच धोनीबद्दल सर्व खेळाडूंच्या मनात सन्मान देखील आहे. याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Ishan Kishan Shows Respect For Mahendra Singh Dhoni refuse to give autograph over mahi signature marathi news)
सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral Video) झालेल्या एका व्हिडिओमध्ये भारताचा विकेटकिपर ईशान किशनचा (Ishan Kishan) व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली. चाहत्याने त्याच मोबाईल कव्हरवर (Mobile Cover) महेंद्रसिंग धोनीचा ऑटोग्राफ (Mahendra Singh Dhoni) आधीच घेतला होता. त्याच मोबाईल कव्हरवर ईशान किशनने स्वाक्षरी द्यावी, अशी विनंती चाहत्याने केली होती.
जेव्हा ईशान किशनने धोनीची स्वाक्षरी (Ishan Kishan Signature) पाहिली, तेव्हा त्याने महेंद्रसिंग धोनीच्या स्वाक्षरीवर (MS Dhoni Signature) स्वाक्षरी करण्यास नम्रपणे नकार दिला. त्यानंतर देखील चाहत्याने स्वाक्षरी दे, अशी विनंती केल्यानंतर ईशान किंचित भडकल्याचं पहायला मिळालं. थोडा वरचा सूर लावत ईशानने धोनीच्या खालच्या बाजूस स्वाक्षरी दिली आणि तो निघून गेला.
पाहा Video -
दरम्यान, ट्विटरवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni ) एवढा आदर दाखवल्याबद्दल चाहते ईशान किशनचे (Ishan Kishan) कौतूक करत आहेत. याआधी देखील मुंबई इंडियन्सच्या (MI) ड्रेसिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी सचिन तेंडूलकरसमोर (Sachin Tendulkar) ईशान किशनचा साधा स्वभाव पाहून अनेकांनी ईशानचं कौतूक केलं होतं. द्विशतक ठोकून (Double Century) देखील पोराचे पाय जमिनीवर असल्याचं पहायला मिळतंय.