MI vs GT, IPL 2023 : आयपीएल 2023 च्या हंगामातील 35 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) या दोन तगड्या संघात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) मागील तीन सामन्यातील विजयी घोडदौड पंजाब किंग्जने रोखली होती, त्यामुळे आता मुंबईला पुन्हा सुपरफास्ट लोकल पकडावी लागणार आहे. तर, मागील सामन्यातील विजय आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न गुजरातचा (Gujarat Titans) असणार आहे. अशातच आता सामन्यापूर्वी एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. या व्हिडिओमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यापूर्वी मुंबई आणि गुजरात संघातील दोन खेळाडू भर मैदानात एकमेकांना भिडल्याचं दिसून आलंय. होय, मुंबईचा ईशान किशन (Ishan Kishan) आणि गुजरातच्या शुभमन गिलचा (Shubman Gill) हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ईशान किशन शुभमन गिलच्या कानाखाली मारताना दिसतोय. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) देखील होत आहे.


लाडक्या मित्राला भेटण्यासाठी पाठीवर आपलं किट घेऊन ईशान शुभमनची वाट पाहत उभा राहिलेला असतो. त्यावेळी शुभमन आपल्या सवंगड्यांसह मैदानात येतो. तेव्हा ईशानने शुभमनचे थेट गचुरे धरले आणि कानाखाली खेचली. त्यावेळी शुभमन हसत देखील होता. त्यानंतर शुभमनने देखील टोक्यात टपली मारली. त्यावरून त्यांच्या मैत्रीचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती होते.


पाहा Video



दरम्यान, गेल्या मोसमात दोन्ही संघ एकदाच आमनेसामने आले होते आणि मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता गुजरात (Gujarat Titans) आपला हिशोब चुकता करणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. तर मुंबई हा सामना जिंकून 5 व्या स्थानी झेप घेण्यासाठी उत्सुक असणार आहे.