Ishan Kishan viral Video: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला डॉमिनिका येथे सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्याच डावात गुडघे टेकवले. पहिल्या डावाच भारताच्या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजला 150 धावांत गुंडाळलं.  रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) गोलंदाजीत 5 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजाला 3 विकेट्स मिळाल्या. त्यानंतर आता भारतीय सलामीवीरांनी कॅरेबियन खेळाडूंची पळताभुई थोडी केली आहे. हा सामना खेळाडू एन्जॉय करत असल्याचं दिसतंय. त्याचाच एक व्हिडिओ सध्या (Viral Video) तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवा ईशानने (Ishan Kishan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पण केलं. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आतापर्यंत 2 कॅच घेतले. पहिल्याच सामन्यात ईशान खेळाडूंची खेचताना दिसतोय. सामन्यावेळी अनेक मजेशीर कमेंट करताना ईशानचा आवाज स्टंप (stump mic) माईकमध्ये कैद झाला आहे. त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत असल्याचं दिसतंय.


नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?


सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ईशान किशन आणि विराट कोहली (Virat kohli) यांच्यातील संभाषण ऐकायला मिळत आहे. त्यामध्ये नेमकी फिल्डिंग लावायची याबद्दल ईशान किशन समजवून सांगताना दिसतोय. त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. गुड थिंकिंग, गुड थिंकिंग... सिंगल मिस किया... विराट भाई थोड़ासा सीधा बस.. असा ईशानचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ पाहून अनेकांना ऋषभ पंतची आठवण आली आहे.


पाहा Video



दरम्यान, पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने आत्तापर्यंत 115 धावा केल्या आहेत. त्यामध्ये यशस्वी जयस्वाल याने 55 धावा तर रोहित शर्मा याने 50 धावा केल्या आहेत. कसोटी पदार्पण सामन्यात, जयस्वालने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांना मागे टाकून एक अनोखी कामगिरी केली.


पाहा दोन्ही संघ


भारत (Playing XI): रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (WK), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.


वेस्ट इंडिज (Playing XI): क्रेग ब्रॅथवेट (C), टॅगेनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाझे, जोशुआ दा सिल्वा (WK), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिकन.