Sport News : भारत आणि झिम्बाब्वेमधील (INDvsZIM) 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने पहिला सामना 10 गड्यांनी जिंकत झकास सुरूवात केली आहे. के. एल. राहुलच्या नेतृत्त्वाखाली भारताने पहिला विजय मिळवला. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी 31 षटकात हे आव्हान पूर्ण केलं. सामना सुरू होण्याआधी 'राष्ट्रगीता'वेळी (National Anthem) इशान किशनवर एका भुंग्याने हल्ला केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं? 
राष्ट्रगीत सुरू असताना सर्व खेळाडू सावधान अवस्थेत होते. इशान किशन डोळे झाकून उभा होता, अचानक एक भुंगा किशनच्या कानाजवळ आलेला दिसतो. त्यावेळी इशान फक्त स्वत: ला वाचवतो मात्र जाग्यावरचा हालत नाही. त्यानंतर तो पुन्हा सावधावन अवस्थेत येतो. 


यादरम्यान इशानच्या बाजूला उभा असलेल्या कुलदीप यादवला याबद्दल काहीच माहिती होत नाही.  इशान किशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 



के. एल. राहुलचं कौतुक
कर्णधार के. एल. राहुलचंही सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. राष्ट्रगीत सुरू होण्याआधी तो च्युविंगम खात होता. ज्यावेळी राष्ट्रगीत सुरू झालं त्यावेळी ते च्युविंगम फेकून दिलं. नेटकऱ्यांनी राहुलच्या या कृतीमुळे त्यांचं कौतुक केलं आहे. राहुलचा गर्व असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेच्या संघाचा अवघ्या 189 धावांत फडशा पाडला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा करत हे लक्ष्य पूर्ण केलं. दुसरा सामना 20 ऑगस्टला होणार आहे.