नवी दिल्ली :  विजय हजारे ट्रॉफी २०१८ साठी ईशांत शर्मा याला दिल्लीचा कर्णधार बनविण्यात आले आहे. मंगवारी दिल्ली एँड डिस्ट्रिक्ट असोशिएशनने याची घोषणा केली. ईशांतसोबत प्रदीप सांगवान यांना १५ सदस्यी संघात जागा देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीममध्ये गौतम गंभीर, ऋषभ पंत, आणि उन्मुक्त चंद या सारखे मोठी नावे आहेत. २७ वर्षीय फलंदाज क्षितीज शर्मालाही चांगल्या कामगिरीमुळे संघात स्थान मिळाले आहे. त्याने आतपर्यंत ११  टी-२० सामने खेळले आहेत. त्याचा स्टाइक रेट ९७.३६ आहे. त्याने आतापर्यंत १११ धावा काढल्या आहेत.  या स्पर्धेसाठी दिल्ली, बंगाल आणि मुंबई संघाची घोषणा करण्यात आहे. 


मनोज तिवारीकडे बंगाल


बंगालाने अंडर १९ जलद गती गोलंदाज ईशान पोरेल याला टीममध्ये सामील करण्यात आली. मनोज तिवारी याच्याकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले आहे. मनोज सोबत अशोक डिंडा आणि अभिमन्यू ईश्वरन याला संघात सामील करण्यात आले आहे. 


आदित्य तरेकडे मुंबईचे नेतृत्त्व 


मुंबईची धुरा आदित्य तरे यांच्याकडे सोपण्यात आली. धवल कुलकर्णीला उपकर्णधार करण्यात आले. दिल्लीचा पहिला समना उत्तर प्रदेश विरूद्ध ५ फेब्रुवारीपासून विलासपूरमध्ये खेळण्यात येणार आहे तर बंगाल आणि महाराष्ट्र दरम्यान नादौनमध्ये सामना खेळणात येणार आहे.  
 


दिल्लीचा संघ  -


ईशांत शर्मा (कप्तान), प्रदीप सांगवान, गौतम गंभीर, ऋषभ पंत, हितेन दलाल, ध्रुव शोरे, नितीश राणा, ललित यादव, उन्मुक्त चंद, नवदीप सैनी, कुलवंत खेजोरलिया, सुबोध भाटी, पवन नेगी, मनन शर्मा, क्षितिज शर्मा
 


बंगालचा संघ  -


मनोज तिवारी (कप्तान), सुदीप चटर्जी, श्रीवत्स गोस्वामी (विकेटकीपर), अभिन्यु ईश्वरन, अभिषेक रमन ,रितिक चटर्जी, अनुष्टुप मजूमदार, विवेक सिंह, कनिश्क सेठ, अशोक डिंडा, सयान घोष, मुकेश कुमार, आमिर गनी, प्रदिप्त प्रामाणिक, सुमन्त गुप्ता, ईशान पोरेल


मुंबईचा संघ  - 


आदित्य तारे, धवल कुलकर्णी, एसके यादव, सिद्धेश लाड, अखिल हेरवादकर, जय बिस्ट, शिवम दुबे, शशांक सिंह, एकनाथ केरकर, आकाश पार्कर, ध्रुव मातकर, रोयस्टोन डायस, शुभम रांजणे, शिवम मल्होत्रा