नवी दिल्ली : भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्मा सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. पहिल्या मॅचमधूनच इशांतने आपली बॉलिंगची जादू दाखवायला सुरूवात केली. त्यानंतर दूसऱ्या मॅचमध्ये या खेळाडूने आपल्या बॅटने धम्माल उडवून दिली. इशांतने काऊंटी क्रिकेटमध्ये लीस्टरशरविरुद्ध खेळताना आपल्या फर्स्ट क्लास करियरमधील पहिल अर्धशतक लगावल. ससेक्सचे दोन खेळाडू क्रिस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर हे सध्या 'आयपीएल'साठी भारतात आहेत. अशावेळी टीमने इशांत शर्माला खेळविण्याचा निर्णय घेतला. 


इशांतची ३ तास बॅटींग 



ससेक्सकडून खेळताना इशांतने लीस्टरशरविरुद्धच्या मॅचमध्ये पहिल्या डावात ६६ रन्सची महत्त्वाची खेळी केली. याआधी इशांतचा सर्वाधिक स्कोर ३१ इतका होता. या खेळात ससेक्सने ७ विकेट देऊन २४० रन्स केले असताना इशांत मैदानावर आला होता. त्यावेळी ससेक्सची टीम दबावात होती. इशांतने मायकल बर्गेससोबत मिळून आठव्या विकेटसाठी १५३ रनची भागिदारी केली. दिल्लीच्या या खेळाडूने ३ तासाहून अधिक वेळ मैदानात घालवत १४१ बॉल्सचा सामना करत ६ फोर आणि १ सिक्स लगावला.