Kane Williamson: केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडच्या टीमचा प्रवास संपुष्टात आला. 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. या सामन्यात 70 रन्सने टीम इंडियाचा विजय  झाला. दरम्यान या विजयानंतर न्यूझीलंड टीमचा कर्धणार केन विलियम्सनने टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. 


आमच्या खेळाडूंचा मला गर्व- केन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार केन विलियम्सनने आपल्या खेळाडूंचं भरभरून कौतुक केलंय. केन म्हणाला, सर्वप्रथम भारताचे खूप अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत टीमने उत्कृष्ट कामगिरी करत खेळ केला आहे. त्याने आज आपला सर्वोत्तम खेळ केला. टीम इंडिया एक अव्वल टीम आहे. या लढतीत टिकून राहिल्याबद्दल मला आमच्या टीमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. बाद फेरीत बाहेर पडणं निराशाजनक आहे.


सेमीफायनल खेळणं खास आहे. एक टीम म्हणून या सामन्यात आम्हाला जे क्रिकेट खेळायचे होते ते आम्ही खेळू शकलो नाही. रचिन आणि मिचेलसाठी ही एक स्पर्धा चांगली होती. त्यांनी खरोखर खूप चांगला खेळ केला असल्याचं केन विलियम्सनने सांगितलं आहे.


टीम इंडियाचा 70 रन्सने विजय


सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 397 रन्स केले. यावेळी कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी शतकं ठोकली. विराटने 117 आणि श्रेयसने 105 रन्सची खेळी केली. याशिवाय शुभमन गिल याने 80 रन्सची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 397 रन्स करता येणं शक्य झालं.


टीम इंडियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मात्र, पारडं पालटलं. कॅप्टन केन आणि डॅरिल मिशेल यांनी संयमी खेळी केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून रोहितने शमीला गोलंदाजी दिली आणि त्याने देखील कॅप्टनला निराश केलं नाही. अखेरीस 70 रन्सने टीम इंडियाचा विजय झाला.