नवी दिल्ली : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा विजरयथ अखेर रोखण्यात यजमानांना अर्थात इंग्लंडच्या क्रिकेट संघाला यश आलं. रविवारी खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ३३७ धावांचं आव्हान त्यांनी भारतीय क्रिकेट संघासमोर ठेवलं. पण, हे आव्हान पेलताना मात्र भारताच्या संघाची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. ज्यावर समालोचन करतेवेळी सौरव गांगुलीने संघाला झापल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी जितका रंजक ठरला तितकंच सामन्याचं समालोचन चर्चेचता विषय ठरलं. ज्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनीच शेअर केले आहेत. ज्यामध्ये एका क्षणाला समालोचन करतेवेळी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर गांगुली चांगलाच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. 


निसटत्या विजयासाठी भारतीय संघाला काही धावांची गरज असतेवेळीच फलंदाज मात्र एक- एक धाव काढत होते. अशा वेळी चौकार आणि षटकार मारण्याकडे त्यांला कलही नव्हता हे पाहून गांगुलीचा पारा चढला. 'नेमकं काय चाललं आहे... मला कळतच नाही आहे.... ' असं म्हणत नासिर हुसैनने क्रीडारसिकांना धोनीची फटकेबाजी पाहायची असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. 



हुसैनला उत्तर देत, समालोचन करतेवेळी समोर आलेल्या या प्रसंगाच्या वेळी आपण काहीही स्पष्टीकरण देऊच शकत नाही, असं म्हणत गांगुलीने एकंदरच संघातील फलंदाजांच्या विचारसणीवर निशाणा साधला.


'प्रतिस्पर्धी संघाकडून अतितटीच्या क्षणाला कोणत्याही प्रकारची गोलंदाजी केली जाईना... तुम्हाला तो चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचवायचा आहे, ही ठाम भूमिका आणि हा संदेश खेळाडूंना द्यायला हवाच होता', असं म्हणत त्याने एक- एक धाव काढण्यावर उपरोधिक वक्तव्य केलं. सामन्याच्या शेवटीसुद्धा गांगुलीने त्याच्या शब्दांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाच्या अनपेक्षित आणि तितक्याच निराशाजनक खेळावर टीका करणं सुरुच ठेवलं. फक्त गांगुलीच नव्हे, तर अनेक क्रीडारसिकांनीही या सामन्याच्या प्रती निराशाजनक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.