Rohit Sharma: जड्डू असं समज की...; लाईव्ह सामन्यात रोहित शर्माचा जडेजाला भलताच सल्ला
Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली.
Rohit Sharma: टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात येतोय. टीम इंडियाने पहिल्या डाव्यात 445 रन्स केले. यानंतर इंग्लंडच्या टीमची सुरुवात फार चांगली झाली. दरम्यान यावेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे चाहत्यांनाही हसू आवरलं नाहीये.
रोहित शर्माने जडेजाला दिला खास सल्ला
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने एका ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. ज्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने मजेशीर प्रतिक्रिया दिली. यावेळी कर्णधार रोहित शर्माने हा सामना टी-20 म्हणून खेळण्याचा सल्ला दिला.
इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना भारतीय स्पिन गोलंदाज जडेजाने शुक्रवारी एकाच ओव्हरमध्ये दोन नो बॉल टाकले. 31 व्या ओव्हरमध्येत्याने दोन नो बॉल टाकले, ज्यावर रोहित शर्माने उत्कृष्ट प्रतिक्रिया दिलाये. रोहितने त्याला या सामन्यात टी-20 प्रमाणए गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला.
रोहित शर्माची मजेशीर रिएक्शन व्हायरल
जडेजाने 2 नो बॉल टाकताच रोहित शर्माची रिएक्शन पाहण्यासारखी होती. यावेळी त्याचा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. रोहित म्हणतोय की, “यार, हा जडेजा आयपीएलमध्ये इतके नो बॉल टाकत नाही. जड्डूने टी-20 लक्षात घेऊन गोलंदाजी कर." दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तिसऱ्या सामन्यात जडेजाची उत्तम कामगिरी
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने शतक देखील झळकावलं होतं. या खेळीत जडेजाने नऊ फोर आणि दोन सिक्सेसच्या मदतीने 112 रन्सची खेळी केली.
आर. अश्विन अचानक टीमबाहेर
तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन अचानक स्कॉडमधून बाहेर झाल्याची माहिती मिळाली. अश्विन ( Ravichandran Ashwin ) अचानक तिसऱ्या टेस्टमधून बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अश्विनसंदर्भात ( Ravichandran Ashwin ) सोशल मीडियावर पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये अश्विनच्या आईची प्रकृती खालावल्याची माहिती देण्यात आलीये. याच कारणामुळे अश्विन ( Ravichandran Ashwin ) टेस्ट सामन्यातून बाहेर पडला असल्याचं समजतंय. अश्विनच्या आईला रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.