IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) बाजी मारत एक डाव आणि 132 रन्सने ऑस्ट्रेलियाला मात दिली. यासोबत टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो रविंद्र जडेजा, ज्याला प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला. मात्र या सामन्यात जडेजा आणि अश्विन गोलंदाजीसाठी वाद घालत असल्याचा खुलासा सामन्यानंतर रोहित शर्माने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये सामन्यादरम्यान त्याला ऑस्ट्रेलिया नव्हे तर भारतीय गोलदाजांच्या आव्हानाचा कसा सामना करावा लागला याबाबत माहिती दिली आहे. 


दोघांच्या भांडणामध्ये अडकला Rohit Sharma


पहिल्या टेस्ट सामन्यात कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात शतकी खेळी केली. परंतु या सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माचं आश्विन आणि जडेजा या त्याच्या दोन गोलंदाजांमध्ये चांगलंच सँडविच झालेलं दिसून आलं. जडेजा आणि आश्विन या दोघांनीही अनुक्रमे 250 आणि 450 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. यासाठीच आपल्याला गोलंदाजीची संधी मिळायला हवी म्हणून दोघांनीही रोहित शर्माचं चांगलंच डोकं खाल्लं. 


सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणला, “मला त्यांच्या माईलस्टोनबद्दल माहिती नव्हतं. जडेजा माझ्याजवळ आला आणि म्हणाला मी, 250 विकेट्सच्या जवळ आहे, त्यामुळे मला बॉलिंग दे. तिकडे आश्विन 450 विकेटच्या जवळ आहे. नंतर आश्विन मला म्हणतो माझ्या 4 विकेट्स झाल्यात असून मला 5 वी विकेट हवीये तर मला बॉल दे. त्यामुळे अशावेळी कोणाला कोणत्या एंडने बॉलिंग द्यायची हा निर्णय घेणं खरंच कठीण असतं.”



टीम इंडियाचा मोठा विजय 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा शनिवारी तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 


भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरले. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.