मुंबई : जम्मू-काश्मीरचा क्रिकेटर परवेझ रसूल आणि मध्यमगती गोलंदाज उमर नजीर यांना यंदाच्या आयपीएलच्या लिलावात कोणी विकत घेतले नाही. मात्र मंजूर अहमद डारला पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंजूरला किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना विकत घेतले. मंजूरने मुलाखतीत म्हटले होते, माझे लक्ष्य सध्या आयपीएल इतकेच आहे. गेल्या वर्षी पुणे वॉरियर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून खेळलेल्या रसूलला यंदा कोणीच खरेदीदार मिळाला नाही. 


रसूल आयपीएलमध्ये खेळणारा पहिला काश्मीरी क्रिकेटर आहे. मंजूर अहमद डारला काश्मीरमध्ये पांडव या नावाने ओळखले जाते. 


मंजूर फक्त क्रिकेटरच नाही तर


२४ वर्षीय मंजूर अहमद काश्मीरचा आहे. तो केवळ एक क्रिकेटरच नव्हे तर वेटलिफ्टर, कबड्डी प्लेयर, लाकडाचे सामान बनवणारा आणि सिक्युरिटी गार्डही आहे. मंजूरचे नाव क्रिकेटरमध्ये सिक्सरमॅन असेच आहे. मंजूरच्या प्रशिक्षकांच्या मते तो खूप प्रतिभावान आणि लांब लांब षटकार मारतो. 


मंजूरची उंची ६ फूट २ इंच तर वजन ८४ किग्रॅ आहे. क्रिस गेल प्रमाणेच त्याची शरीरयष्टी असल्याने लांब लांब षटकार मारणे सोपे जाते. पांडवांप्रमाणेच तो धिप्पाड असल्याने त्याला त्याच नावाने हाकही मारली जाते. 


मिस्टर १०० मीटर सिक्सरमॅन आहे मंजूर


जम्मू-काश्मीरचे क्रिकेट संघाचे कोच अब्दुल कयूम यांच्या मते, मंजूर मिस्टर १०० मीटर सिक्सरमॅन आहे. तो बॉलला खऱ्या अर्थाने आकाशात भिरकावतो. गेल्या वर्षी पंजाबसोबतच्या सामन्यात त्याने काही षटकार लगावले होते जे १०० मीटरहून अधिक लांबीचे होते.