मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं फार जवळचं आणि जुनं नातं आहे. काही क्रिकेटर्सनी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसोबत लग्नगाठ बांधल्याचेही किस्से आहेत तर काहीजण बांधण्याच्या तयारीमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. श्रीदेवी यांची मुलगी आणि क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांच्या भेटीची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि दिनेश कार्तिक यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. जान्हवी कपूरने क्रिकेट खेळतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जान्हवी सध्या मिस्टर अॅण्ड मिसेस माही सिनेमाच्या शूटिंगसाठी ट्रेनिंग घेत आहे. 


या ट्रेनिंग दरम्यानचा तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोनंतर दिनेश कार्तिक आणि जान्हवीच्या भेटीगाठी वाढण्यामागचं कारण समोर आलं. क्रिकेटपटू दिनेश कार्तिककडून सिनेमासाठी जान्हवी कपूर ट्रेनिंग घेत असल्याची माहिती मिळाली आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस माही या सिनेमासाठी जान्हवीला दिनेशकडून क्रिकेट खेळण्याचं ट्रेनिंग सुरू आहे. 


या सिनेमामध्ये जान्हवी कपूरसोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावही दिसणार आहे. याआधीही या दोघांनी ‘रुही’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तिने फोटो शेअर क्रिकेट कॅम्प असं कॅप्शन दिलं आहे. 


जान्हवीने आणखी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सूर्यास्ताचा फोटो शेअर करण्यात आला आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस माही सिनेमामध्ये जान्हवी कपूर चौकार-षटकार लगावताना दिसणार आहे. तर तिने या सिनेमाच्या टीमसोबतचाही फोटो शेअर केला आहे. 


या सिनेमाची घोषणा गेल्या वर्षीच करण्यात आली होती, त्यामुळे आता प्रेक्षक जान्हवीला क्रिकेट खेळताना पाहू शकणार आहेत. या सिनेमाच्या रिलीज डेटकडे चाहत्यांचं लक्ष आहे.