Jason Roy: बुधवारी चिन्नस्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच आरसीबीचा 21 रन्सने पराभव केला. आरसीबीकडून विराट कोहलीचं (Virat Kohli) अर्धशतक या सामन्यात व्यर्थ गेलं. तर कोलकात्याकडून जेसने रॉयने (Jason Roy) तुफानी खेळी केली. जेसनने या सामन्यात 29 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी केली. मात्र उत्तम खेळी करून देखील रॉयला त्याचं एक कृत्य फार महागात पडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या सामन्यात जेसन रॉयने एक चूक केली. दरम्यान या चुकीमुळे बीसीसीआयने त्याच्यावर दंड ठोठावला आहे. जेसन रॉयने नेमकं काय केलं हे जाणून घेऊया.


जेसन रॉयला बीसीसीआयने ठोठावला दंड


रॉयला आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. यामुळे जेसन रॉयला त्याच्या सामन्याच्या 10 टक्के दंड भरावा लागणार आहे. बीबीसीआयने जेसन रॉयवर ही कारवाई केली आहे. 


आरसीबीविरूद्धच्या सामन्यात 10 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. विजयकुमार वैशाख यावेळी गोलंदाजी करत होता. 10 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रॉय बोल्ड झाला. यावेळी पव्हेलियनमध्ये जात असताना जेसन रॉय संतपला होता. यावेळी रागाच्या भरात त्याने बॅट हवेत उडवली. हेच कृत्य जेसनला महागात पडलं आहे. 


यावेळी आयपीएलकडून एक प्रेस रिलीज जाहीर करण्यात आलंय. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज जेसन रॉयवर मॅच फीसच्या 10 टक्के दंड लगावण्यात आला आहे. रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्धच्या सामन्यात आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा आरोप लावण्यात आला आहे. जेसन रॉय हा कलम 2.2 अंतर्गत लेव्हल वनमध्ये दोषी आढळलाय. 


जेसन रॉयचं तुफानी अर्धशतक


रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरूद्धच्या सामन्यात उत्तम फलंदाजी करताना जेसन रॉयने अर्धशतक झळकावलं. बुधवारी कोलकात्याच्या झालेल्या विजयामध्ये जेसनची भूमिका फार महत्त्वाची होती. या सामन्यात रॉययने 29 बॉल्समध्ये 56 रन्सची खेळी केली. यामध्ये 4 फोर आणि 5 सिक्सेसचा समावेश आहे. 


जेसन रॉय आणि नितीश राणा यांच्या खेळीच्या जोरावर केकेआरने 200 रन्सचा टप्पा गाठला. 201 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फलंदाजांची चांगलीच नाचक्की झाली. अवघ्या 179 रन्सवर आरसीबीने मजल मारली. अखेर केकेआरने 21 रन्सने हा सामना जिंकला.