India Vs England 5th Test: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहने तुफान फटकेबाजी केली. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर बुमराहने एका षटकात 35 ठोकल्या. यात बॅटने 29 धावांची खेळी केली, तर 6 आवांतर धावा मिळाल्या. बुमराहने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर वाइड बॉलवर चौकार मिळाला. यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. कसोटी क्रिकेट इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा विक्रम नावावर प्रस्थापित झाला आहे. असं असताना स्टुअर्ट ब्रॉडचा जोडीदार असलेल्या वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बुमराहने खेळलेले काही शॉट्स असे होते की, ते थेट हातात झेल गेले असते. जर असं झालं असतं तर यावर कुणी चर्चा केली नसती. माझ्या मते त्या दिवशी त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. काही चेंडूंवर बाद होऊ शकला असता. पण बेन स्टॉक्सच्या रणनितीनुसार ब्रॉडने अशीच गेंदबाजी करण्यावर भर दिला. जर नशिबाची साथ मिळाली असती, तर बुमराह बाद झाला असता.", असं जेम्स अँडरसननं सांगितलं. 


दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने पाच गडी गमवून 84 धावा केल्या. अजून भारताकडे 332 धावांची आघाडी असून मजबूत स्थितीत आहे. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे उर्वरित खेळाडू झटपट बाद करण्यावर भारतीय गोलंदाजांचा जोर असणार आहे.