Jasprit Bumrah : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याची अनुपस्थिती ही टीम इंडियाला प्रत्येक वेळी जाणवली. मैदानापासून दूर असण्याचं कारण म्हणजे, त्याची दुखापत. या दुखापतीमुळे एशिया कप आणि टी-20 वर्ल्डकपपासून देखील तो दूर होता. मात्र आता बुमराहची पत्ती संजना गणेशनबाबत एक चर्चा जोर धरू लागलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच बुमराहच्या दुखापतीबाबत अपडेट समोर आलं. यामध्ये बुमराह पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला आणखी 6 महिने लागणार असल्याची माहिती आहे. 


नुकतंच वुमेन्स प्रीमियर लीग (WPL 2023) ला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये बुमराह त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिचा एक फोटो व्हायरल होतोय. दरम्यान हा फोटो पाहून असा दावा केला जातोय की, लवकर हे जोडपं आई बाबा होणार आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संजना गरोदर असल्याचा अंदाज लावण्यात येतोय.


जसप्रीत बुमराह होणार बाबा?


दरम्यान या गोष्टीबाबत अजूनही कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये संजनाचा बेबी बंप दिसत असल्याचा अंदाज लावला जातोय. त्यामुळे टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.



2021 मध्ये झालेलं बुमराहचं लग्न


भारतीय क्रिकेट टीमचा स्टार क्रिकेटर जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. गोव्यामध्ये 15 मार्च 2021 रोजी त्यांचा विवाह झाला होता. यावेळी केवळ आणि त्यानंतर त्यांचा अनंत कारज समारंभ गुरुद्वारामध्ये झाला. त्यांच्या लग्नात फक्त जवळचे नातेवाईकांचा समावेश होता. 


बुमराह दोन्ही स्पर्धांमधून बाहेर


मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात बुमराह जखमी झाला. त्याला पाठीसंदर्भातील समस्या आहे. मागील वर्षी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्येही त्याला खेळता आलं नाही ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपही खेळमार नाही. भारतीय चाहते आता बुमराह किमान या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवस क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत तरी दिसावा यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र बुमराहच्या गुडघ्यावर सर्जरी करावी लागणार असल्याचं निश्चित आहे.


डिसेंबरमध्ये सरावाला केली सुरुवात


बुमराहने डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा गोलंदाजीचा सराव सुरु केला होता. त्यामुळेच निवड समितीने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या व्हाइट बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी संघात स्थान दिलं होतं. मात्र तो पूर्णपणे फिट नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


(Disclaimer: याठिकाणी दिलेली माहिती व्हायरल फोटोवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)