IND vs IRE: जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा कॅप्टन? `या` नव्या छाव्यांना संधी मिळण्याची शक्यता
Jasprit Bumrah, Ireland Series: टीम इंडियाला आयर्लंडमध्ये नवा कर्णधार मिळू शकतो, अशा चर्चेने देखील जोर धरलाय. त्याला कारण ठरतंय राहुल द्रविडची (Rahul Dravid) आयडिया.
IND vs IRE, Jasprit Bumrah: आगामी वनडे वर्ल्ड कपपूर्वी (World Cup 2023) आता टीम इंडिया नवे प्रयोग करत असल्याचं पहायला मिळतंय. टी-ट्वेंटी क्रिकेटची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवून रोहित शर्मा फक्त वनडे आणि कसोटी सामन्याची जबाबदारी अंगावर घेतोय. तोंडावर आलेल्या वनडे वर्ल्ड कपपूर्वी आता टीम इंडिया आयलँड (Ireland Series) दौऱ्यावर जाणार असल्याने या दौऱ्यात कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलीये. अशातच आता सर्वांना प्रतिक्षा लागलीये ती स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर (India Tour Of Ireland) जाणार आहे. टीम इंडियाला आयर्लंडमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. मात्र, या दौऱ्यात रेग्युलर टीम खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला आयर्लंडमध्ये नवा कर्णधार मिळू शकतो, अशा चर्चेने देखील जोर धरलाय. त्याला कारण ठरतंय राहुल द्रविडची (Rahul Dravid) आयडिया.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आशिया कपच्या तयारीसाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेनंतर आठवडाभराच्या शिबिराचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आशिया कपसाठी हार्दिक पंड्या आशिया कपच्या तयारी शिबिरात असू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी येत्या काळात पुनरागमन करण्याची शक्यता असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला कर्णधारपद दिलं जाऊ शकतं, अशी माहिती क्रिकबझने दिली आहे. त्याचबरोबर या टीममध्ये यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार नव्या चेहऱ्यांना यांच्यासारख्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा - MS Dhoni: रांचीच्या रस्त्यावर धोनीचा स्वॅग, Rolls Royce फिरवतानाचा Video व्हायरल!
दरम्यान, 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी भारतीय संघाला आयर्लंडविरुद्ध 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर आशिया कप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. अशातच आता आशिया कप आणि वनडे वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराहच्या उपलब्ध असेल का? असा सवाल देखील विचारला जात आहे. जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. या टी-20 सामन्यानंतर बुमराह भारतासाठी दुसरा कोणताही सामना खेळू शकला नाही.