IND VS AUS : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतून बाहेर
India Squad Australia ODIs:टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे,
India Squad Australia ODIs: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia)यांच्यात 4 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने 2-0 ने आघाडी घेतलीय. या स्पर्धेनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे, तर अनेक खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले आहे.(jasprit bumrah ruled out of the australia series at home ind vs aus one day series)
ऑस्ट्रलिया विरूद्ध पहिल्या वनडे सामन्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनुपस्थितीत असणार आहे.रोहित वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या वनडेसाठी उपस्थित राहू शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी टीमच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्याकडे ( Hardik Pandya) सोपण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्माच टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
हा स्टार खेळाडू संघातून OUT
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) फीट होईल आणि संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जसप्रीत बुमराह घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर पडला आहे.कारण तो अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नाही आहे. त्यामुळे तो मालिकेतून बाहेर पडला. तसेच जयदेव उनाडकट 10 वर्षानंतर संघात पुनरागमन करणार आहे. हर्षदीप सिंहच्या जागी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार आहे.
टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेन्द्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट