सेन्चुरियन : सेन्चुरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय मिळवत ५-१ अशी दणक्यात मात दिलीए. त्याचसोबतच भारतानं ही एकदिवसीय मालिका ५-१ अशा मोठ्या फरकानं जिंकलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान जसप्रीत बुमराहने घेतलेल्या एका कॅचची चांगलीच चर्चा होतेयं. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. ही कॅच बुमराहने घेतली नसून त्याच्या नशिबाने घेतलीए असे म्हटले जातेय.


२०५ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय टीमनं ३२.१ ओव्हरमध्ये केवळ दोन विकेटच्या नुकसानीसहीत हा विजय मिळवला.  ३२ व्या ओव्हरचा दुसरा बॉल. बेहरादीन फलंदाजी करत होता. त्याने टोलवलेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेला गेला. हवेतील चेंडू पकडण्याचा बुमराह प्रयत्न करत होता.



तो स्वत:तर चेंडूच्या खाली आला होता. पण त्याने बनविलेल्या हाताच्या पोझिशनमधून डावा हात निसटला होता. कॅच पकडल्या पकडल्या त्याने जमिनिवर कोलांटी घेत तात्काळ उठला. आश्चर्याने सर्वांकडे पाहू लागला. दरम्यान त्याचे सर्व सहकारी धावत आले. कारण त्यांना माहित होतं कॅच बुमराहपेक्षा त्याच्या नशिबाने पकडलीय.


कॅप्टन 'मॅन ऑफ द मॅच' 


या मॅचमध्ये झंझावाती शतक झळकावणारा टीम इंडियाचा कॅप्टन 'मॅन ऑफ द मॅच' ठरलाय. या सीरिजमधलं विराटचं हे तिसरं शतक ठरलं... तर वन डे करिअरमधलं हे त्याचं ३५ वं शतक ठरलंय.


त्यानं ८२ बॉल्समध्ये शतक साध्य केलं. तो शेवटपर्यंत १२९ रन्सवर नाबाद राहीला तर रहाणेनं ३४ रन्स ठोकले.