जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहचे आजोबा हे काही दिवसांपासून बेपत्ता होते पण आता त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीमचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहचे आजोबा हे काही दिवसांपासून बेपत्ता होते पण आता त्यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे. जसप्रीत बुमराहच्या आजोबांचा मृतदेह साबरमती नदीत सापडला असल्याची माहिती आहे.
३ दिवसापासून बेपत्ता
जसप्रीतचे आजोबा संतोक सिंह बुमराह शुक्रवार पासून बेपत्ता होते. याबाबत पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. उत्तराखंडचे राहणारे संतोक सिंह बुमराह ५ डिसेंबरला वाढदिवसाच्या निमित्ताने अहमदाबादला आले होते. 84 वर्षाचे संतोक सिंह यांची मुलगी राजेंदर कौर बुमराह यांनी पोलिसात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पण 'संतोक सिंह याना जसप्रीत बुमराहला भेटण्यासाठी नाही दिलं गेलं. त्यानंतर ते बेपत्ता झाले असं या तक्रारीमध्य़े लिहिलं आहे.
जसप्रीतला भेटण्यासाठी आले होते
१ डिसेंबरला संतोक सिंह त्यांच्या मुलीच्या घरी आले होते. त्यांना जसप्रीतला भेटण्याची इच्छा होती. ५ डिसेंबरला त्याचा वाढदिवस होता. पण त्यांची भेट नाही होऊ शकली. ८ डिसेंबरला त्यांनी झारखंडमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला फोन करुन सुनेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.
जसप्रीतला भेटू न दिल्याची तक्रार
राजेंदर कौर या त्यांच्या मुलाने सांगितलं की, 'जसप्रीत बुमराहची आई शाळेत शिकवते. तेथे भेटण्यासाठी संतोक सिंह बुमराह गेले होते. पण जसप्रीतची आईने त्यांना भेटण्यासाठी नकार दिला. जसप्रीतला कुटुंबातून कोणीही संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये असं देखील त्यांनी म्हटलं. जसप्रीतचा नंबर देण्यासही त्यांनी नकार दिला.'
लहानपणीच झालं वडिलांचं निधन
जसप्रीत बुमराह ७ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याचे वडील आणि आजोबा एकेकाळी मोठे बिझनेसमॅन होते. पण जसप्रीतच्या वडिल्यांच्या मृत्यूनंतर संतोक सिंह एकटे पडले. ज्यामुले त्यांचा व्यवसाय बंद पडला. ते आता रिक्षा चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करत होते.