भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावस्कर चषक स्पर्धेमधील शेवटचा कसोटी सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु झाला आहे. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी उपस्थिती लावली. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मैत्रीपूर्ण संबंधांना चालना देण्यासाठी दोन्ही पंतप्रधानांनी हा सामना एकत्र पाहिला. या सामन्याआधी पंतप्रधान मोदी आणि अल्बनीज यांनी मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना अभिवादन केलं. यानंतर दोन्ही पंतप्रधानांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला टोपी देऊन सामन्याला सुरुवात केली. या सामन्याच्या आधी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे सचिव जय शाह यांनी पंतप्रधान मोदींचा सन्मानित केलं. मात्र मोदींनी सन्मानित करण्यासाठी जय शाह यांनी दिलेल्या भेटवस्तूची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, अहमदाबादमध्ये काही महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांचं स्वागत आणि आदर सन्मान करण्यात आला. बीसीसीआयनेही मोदींचा सन्मान करण्यात आला. जय शाह यांनी मोदींचा सत्कार केला. मात्र मोदींचा सत्कार करताना जय शाह यांनी मोदींना त्यांचाच फोटो भेट दिला. बरं हा सारा कार्यक्रम पार पडला नरेंद्र मोदी स्टेडियमवर. त्यामुळेच जय शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नरेंद्र मोदी स्टेडियमवर नरेंद्र मोदींचा फोटो देऊन सत्कार केला अशा अर्थाच्या कॅप्शनसहीत शाह यांना ट्रोल केलं जात आहे. अनेकांनी हा फोटो अशाच अर्थाच्या कॅप्शनने व्हायरल केला आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुनही जय शाह यांना ट्रोल केलं जात आहे. 


1) अमित शाहांकडून मोदींना मोदींचा फोटो भेट



2) जय शाहांकडून मोदींचा सत्कार



3) नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोदींना मोदींचा फोटो भेट



4) मोदींनाच मोदींचा फोटो



5) अमित शाहांच्या मुलाकडून मोदींना भेट



6) मोदी, मोदी स्टेडियममध्ये मोदींच्या फोटोसहीत



7) मोदी स्टेडियमवरील कार्यक्रम



मोदींनी मैदानामध्ये जाऊन सर्व भारतीय खेळाडूंची भेट घेतली. सर्वांशी हस्तांदोलन करुन मोदी राष्ट्रगीतासाठी भारतीय खेळाडूंबरोबरच रांगेत उभे राहिले.