जयदेवचा नाद खुळा! पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रीक मारत घेतल्या आणखी विकेट्स
टीम इंडियाच्या बॉलरचा कारनामा, डायरेक्ट Hat Trickच घेतली
Jaydev Unadkat first over hattrick : स्टार खेळाडू जयदेव उनाडकटने (saurashtra vs delhi) वर्षाच्या सुरूवातीला चमकदार कामगिरी केली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji trophy 2022-23) जयदेवने पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक (Jaydev Unadkat hattrick) घेत वर्षाची सुरूवात केली आहे. बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जयदेवला संधी देण्यात आली होती. जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर जयदेवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 वर्षांनी पुनरागमन केलं होतं. कसोटीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या जयदेव उनाडकटने इतिहास रचला आहे. (Jaydev Unadkat first over hattrick Ranji Trophy 2023 latest marathi sport news)
रणजी ट्रॉफीमधील सौराष्ट आणि दिल्लीमधील चालू असलेल्या सामन्यात जयदेवने पहिल्याच षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर दिल्ली संघाच रनमशिन म्हणून ओळखला जाणाऱ्या ध्रुव शौरीला बोल्ड, वैभव रावला कॅच आऊट तर कर्णधार यश धुलला पायचीत पकडत हॅट्रीक पूर्ण केली. इतकंच नाहीतर जयदेवने 12 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या, हॅट्रीक घेतल्यानंतर दुसऱ्याच षटकात त्याने आणखी दोन बळी घेतले.
जयदेव उनाडकटने डावाच्या पहिल्याच षटकात तिन्ही विकेट घेतल्या. तिन्ही फलंदाज शून्यावर बाद झाले. रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा जयदेव उनाडक पहिला गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा इरफान पठाण आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील पहिला गोलंदाज ठरला होता. इरफानने 2006 मध्ये कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध चमत्कार केला होता. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सलमान बट, पाचव्या चेंडूवर युनूस खान आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसूफ पठाणला बाद केलं होतं.
दरम्यान, दिल्लीचा संघ 133 धावांवर ऑलआऊट झाला आहे. ऋतिक शोकीनने दिल्लीचा डाव सांभाळला त्याने नाबाद 68 धावांची खेळी केली त्याला शिवांक वशिष्टनेही 38 धावांची खेळी करत डाव सावरला होता मात्र त्यालाही उनाडकटने माघारी पाठवलं. सौराष्टचा कर्णधार जयदेव उनाडकटने सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या.