आयपीएलचा लिलाव संपाला, हा भारतीय ठरला सगळ्यात महागडा खेळाडू
आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव अखेर संपला आहे.
बंगळुरू : आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठीचा लिलाव अखेर संपला आहे. दोन दिवस चाललेल्या या लिलावामध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. यंदाच्या लिलावामध्ये भारताचा फास्ट बॉलर जयदेव उनाडकट सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. उनाडकटला राजस्थान रॉयल्सनं ११.५ कोटी रुपयांना विकत घेतलं.
उनाडकटला विकत घेण्यासाठी राजस्थानबरोबरच कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपरकिंग्जनी जोरदार बोली लावली होती.
पांडे-राहुलही कोट्याधीश
उनाडकटबरोबरच मनिष पांडे आणि लोकेश राहुल शनिवारी झालेल्या लिलावातले सगळ्यात महागडे खेळाडू होते. या दोघांना ११ कोटी रुपयांना विकत घेण्यात आलं. मनिष पांडेला सनरायजर्स हैदराबादनं तर राहुलला पंजाबनं विकत घेतलं.
बेन स्टोक्स सगळ्यात महागडा
इंग्लंडचा बेन स्टोक्स मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. बेन स्टोक्सला राजस्थान रॉयल्सनं १२.५ कोटी रुपयांना विकत घेतलं.