मुंबई: IPLच्य़ा चौदाव्या सामन्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात पहिला सामना जिंकण्यात यश मिळालं आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात 3 विकेट्सनी राजस्थान संघ जिंकला आहे. या हंगामात राजस्थानच्या गोलंदाजानं जबरदस्त कमबॅक केलं आहे. तर विजयानंतर जल्लोषही केला आहे. या विजयाचं श्रेय ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर आणि जयदीप या गोलंदाजाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयदेव उनादकटने दिल्ली विरुद्धच्या सामन्यातून दमदार कमबॅक केलं आहे. या सामन्यात त्याने दिल्ली संघाला पहिल्या 4 ओव्हरमध्ये केवळ 15 धावा दिल्या. शिवाय तीन विकेट्सही घेतल्या. त्याला पंजाब विरुद्धच्या सामन्यात संघात प्लेइंग इलेवनमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. मात्र दिल्ली विरुद्धच्या सामन्यात त्याला ही संधी मिळाली आणि त्यानं सोनं केलं. 



श्रेयस गोपाळच्या जागी जयदेव उनादकटला संधी देण्यात आली. त्याने पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या तीन दमदार फलंदाजांना तंबुत माघारी धाडलं. त्याच्या गोलंदाजीपुढे दिल्ली संघाला लोटांगण घालायची मैदानात वेळ आली. 


2017मध्ये जयदेवने 12 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. 2018 मध्ये राजस्थानने लिलावत त्याला आपल्या संघात घेतलं. त्याने केवळ 5 सामने खेळून 11 विकेट्स घेतल्या. 2019मध्ये 11 सामने खेळून 10 विकेट्स घेतल्या होत्या. जयदेवनं आतापर्यंत IPLमध्ये 81 सामने खेळले आहेत.