ICC महिला T20 विश्वचषक 2024 ची सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने 4 ऑक्टोबर रोजी दुबईच्या मैदानावर न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिला सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 20 षटकांत 160 धावा केल्या, तर भारतीय टीमने लक्ष्याचा पाठलाग करताना 19 षटकांत केवळ 102 धावा केल्या. या  सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय महिला संघातील खेळाडू निराश झाले होते. मात्र, बीसीसीआयने खेळाडूंना नवी प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.  या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये भारतीय पुरुष संघाप्रमाणेच महिला संघातही प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम बेस्ट फील्डरला मेडल  देण्याची परंपरा सुरू झाली आहे. यामध्ये पहिले मेडल खेळाडू जेमिमाह रॉड्रिग्सला मिळाले आहे.  


जेमिमा झाली भावूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय महिला संघाचे फिल्डिंग प्रशिक्षक मुनीश बाली यांनी सर्व खेळाडूंना संबोधित केले. यानंतर त्यांनी सामन्यादरम्यान बेस्ट फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी सामन्यादरम्यान स्मृती मंधानाने घेतलेल्या झेलचेही कौतुक केले. यानंतर शेवटी जेमिमाहचे नाव हे सर्वोत्तम बेस्ट फील्डर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. जेमिमाला हे पदक देण्यासाठी त्याने कॅप्टन हरमनप्रीत कौरला बोलावले. जेमिमाहला जेव्हा हे पदक देण्यात आले तेव्हा ती भावूक झाली. 


 



टीम इंडिया पुनरागमन करेल - जेमिमाला 


सामन्यात दारुण पराभवानंतर भारतीय महिला संघासाठी उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग अवघड झाला आहे. आता उरलेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया शानदार कामगिरी दाखवेल, असा विश्वास जेमिमाहने व्यक्त केला आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानी महिला संघाविरुद्ध ६ ऑक्टोबर रोजी दुबईतील त्याच मैदानावर खेळवला जाणार आहे.