मुंबई: जोफ्रा आर्चर हे नावच पुरेस आहे. त्याच्या हाताच्या सर्जरीमुळे IPLमध्ये तो खेळू जास्त खेळू शकलाही. मात्र तो रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा मैदानात खेळण्यासाठी उतरला आहे. वेगवान गोलंदाज आर्चरने टाकलेल्या घातक बाऊन्सर आणि बॉलमुळे विरुद्ध संघातील खेळाडू एकामागे एक तंबुत परतत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्राने टाकलेल्या घातक बॉलमुळे फलंदाज घाबरून खाली बसला. बसला नाहीच जवळपास त्याचा तोल गेला आणि गोलांटी उडीच मारायची बाकी ठेवली होती. तर विकेटकीपर बॉल पकडण्याच्या नादात खाली पडला. जोफ्राचे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 






जोफ्राने काउंटी चॅम्पियनशिपसाठी सुरू असलेल्या सामन्यात आर्चरनं 13 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आहेत. जॉक क्राउली आणि केंट संघाचा कर्णधार बेल ड्रूमंडला आऊट केलं आहे.


जोफ्राच्या उजव्या हातात काचेचा तुकडा घुसल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे IPLमधून देखील जोफ्रा बाहेर झाला होता. सध्या IPL कोरोनामुळे स्थगित करण्यात आलं आहे. जोफ्रानं मैदानात कमबॅक केल्यानंतर राजस्थान संघाने त्याचा फोटो आपल्या सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे.