IPL 2019: वॉर्नर-बेअरस्टो जोडीचा दणका, विजयासोबतच केला विक्रम
हैदराबादकडून डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरेस्टो या जोडीनेच हैदराबादचा विजय निश्चित केला.
हैदराबाद : हैदराबादने कोलकाताचा ९ विकेटने एकतर्फी पराभव केला आहे. कोलकाताने विजयासाठी दिलेल्या १६० रनचे आव्हान हैदराबादने तब्बल ९ विकेट आणि ५ ओव्हर राखून पूर्ण केलं. हैदराबादकडून डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरेस्टो या सलामीच्या जोडीनेच हैदराबादचा विजय निश्चित केला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३१ रनची पार्टनशीप केली. हैदराबादच्या या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने ३८ बॉ़लमध्ये ६७ रन केल्या. तर बेअरेस्टोने ४३ बॉलमध्ये नॉटआऊट ८० रन ठोकल्या.
या दोघांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या १३१ रनच्या पार्टनरशीप सोबत आपल्या नावे एक रेकॉर्ड केला आहे. सलामीवीरांच्या जोडीने आयपीएलच्य एका पर्वात सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड बेअरेस्टो- वॉर्नर या जोडीने केला आहे. या दोघांनी आयपीएलच्या १२ व्या पर्वात सर्वाधिक ७३३ रनाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे याआधी सलामीवीर म्हणून केलेल्या टॉप-३ च्या पार्टनरशीप या शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नरच्या नावे आहेत. पण या टॉप-३ च्या पार्टनरशीप या दोन वर्षाआधीच्या आहेत.
आयपीएलच्या एका पर्वामध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या सलामीवीरांच्या जोड्या
जोडीचे नाव रन वर्ष
१. जॉनी बेअरस्टो–डेव्हिड वॉर्नर – ७३३ रन २०१९
२. डेव्हिड वॉर्नर–शिखर धवन – ७३१ रन २०१६
३. डेव्हिड वॉर्नर–शिखर धवन – ६५५ रन २०१७
४. डेव्हिड वॉर्नर–शिखर धवन – ६४६ रन २०१५