India vs England 1st test : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीने इंग्लंडचा बॅझबॉल उद्धवस्त केला. मात्र, दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. पहिल्या डावानंतर 190 धावांची लीड टीम इंडियाला मिळाली होती. मात्र, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला (Jonny Bairstow) आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन रोहित शर्माने सुरूवातीपासून आश्विन आणि जडेजाच्या फिरकीचा मारा सुरू केला. मात्र,  इंग्लंडने पुन्हा आक्रमक मारा केला अन् सामना वाचवण्याचा प्रयत्न केला. स्पिनर्सचा खेळ चालत नसल्याचं लक्षात येताच रोहितने पुन्हा बुमराहला गोलंदाजीला बोलवलं. त्याने दोन विकेट्स काढल्या. मात्र, दुसऱ्य़ा बाजूने आक्रमण करत असलेला जड्डू देखील प्लॅनसह गोलंदाजी करत होता.


बेअरस्टोच्या उडवल्या दांड्या...


जो रूटची विकेट गेल्यानंतर जॉनी बेअरस्टोने मोर्चा सांभाळला. पण जडेजाने 27 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवर कमाल केला. या ओव्हरचा तिसरा बॉल असा काही वळाला की विकेटकिपर भरत देखील चकित झाला. त्यानंतर जड्डूने पुढच्याच बॉलवर त्याच टप्प्यात गोलंदाजी केली अन् जॉनी बेअरस्टोच्या दांड्या उडाल्या. विकेट पडल्यानंतर नेमका बॉल आत कसा वळाला, हे खुद्द बेअरस्टोला देखील कळालं नाही.


पाहा Video



दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.