Jonny Bairstow Viral Video: अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या रन आऊटने (Jonny Bairstow controversial Run Out) क्रिकेट जगतात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅमेरून ग्रीनच्या (Cameron Green) 52 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो ज्याप्रकारे धावबाद झाला, त्यावरून वाद पेटला होता. क्रिडाविश्वातच नव्हे तर राजकीय व्यासपिठावर देखील वाद चांगलाच रंगल्याचं दिसून आलं होतं. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांना देखील या वादात उडी मारावी लागली होती. अशातच आता तिसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोने कांगारूंना धडा शिकवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच्या चुकीपासून धडा घेतला आणि चेंडू पूर्ण झाल्यानंतर त्याच्या क्रीजला चिकटून राहिल्याचं दिसून आलं. हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीसाठी आला तेव्हा जवळपास प्रत्येक चेंडूवर तो सतर्क होता. त्याचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. 


14 व्या ओव्हरला काय झालं?


मिशेल मार्शने गोलंदाजी केली तेव्हा चेंडू बेअरस्टोच्या बॅटला लागला आणि क्रीजजवळ पडला. बेअरस्टो क्रीझच्या अगदी पुढे होता, तर स्टीव्ह स्मिथने वेगवान धाव घेत चेंडू पकडला. स्मिथला चेंडू जवळ येताना पाहून बेअरस्टो लगेच परतला. त्यावेळी त्याने 30 सेकंद क्रीझ सोडली नाही. त्यावेळी स्मिथ आणि अॅलेक्स कॅरी देखील खदाखदा हसत असल्याचं दिसून आलं.


पाहा Video



दरम्यान, तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात बेअरस्टोची बॅट चालली नाही. 37 चेंडूत 12 धावा करून तो बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. बाद झाल्यानंतर बेअरस्टो अॅलेक्स कॅरीकडे टक लावून पाहत होता. मात्र, काही वेळानंतर मैदानावरील वातावरण शांत झालं.


दुसऱ्या सामन्यात नेमकं काय झालं?


जॉनी आपल्या सहकारी खेळाडूशी बोलण्यासाठी क्रीझच्या पुढे जात असताना, विकेटच्या मागून अॅलेक्स कॅरीने (Jonny Bairstow controversial Run Out) त्याला धावबाद केले. त्यामुळे कांगारूंनी अंपायरकडे अपिल केली. अंपायरने थर्ड अंपायरकडे बोट दाखवलं. त्यानंतर थर्ड अंपायरने जॉनी बेअरस्टोला आऊट घोषित केलं. अंपायरचा निर्णय ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. मात्र, निर्णय बरोबर असल्याचं सांगण्यात आलं.